शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

14 एकरांचा महाल, 18 विंटेज कार आणि 1000 कोटींचे दागिने; 30 वर्षानंतर कायदेशीर लढाईचा अंत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 17:59 IST

पंजाबच्या फरीदकोटचे महाराजा हरिंदर सिंग ब्रार यांची 20 हजार कोटींची संपत्ती मुलींच्या नावे करण्यात आली आहे.

मोहाली: पंजाबमधील एका मालमत्तेची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती, आज त्या संपत्तीचा वाद अखेर संपला. गेल्या 30 वर्षांपासून मालमत्तेचा सुरू होता. हा वाद फरीदकोटचे महाराजा सर हरिंदर सिंग ब्रार यांच्या शाही संपत्तीचा आहे. या मालमत्तेची किंमत 5-10 कोटी नाही, तर 20 हजार ते 25 हजार कोटींपर्यंत आहे. आता सुप्रीम कोर्टाने या संपत्तीवर हरिंजर सिंग ब्रार यांच्या मुलींचा हक्क सांगितला आहे. या मालमत्तेवर आधी दावा कोणी केला आणि 30 वर्षांच्या लढाईत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात कसे पोहोचले, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, जाणून घेऊ महाराजा हरिंदर सिंग आणि त्यांच्या संपत्तीबद्दलची माहिती.

सुप्रीम कोर्टाने बुधवारी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत 30 वर्षांची लढाई संपवली. उच्च न्यायालयाच्या निर्णयात महाराजा हरिंदर सिंग यांच्या मुली अमृत कौर आणि दीपिंदर कौर यांना शाही संपत्तीत मोठा वाटा देण्यात आला आहे. सुमारे महिनाभरापूर्वी न्यायमूर्ती यू यू ललित, न्यायमूर्ती एस रवींद्र भट आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद आणि मृत्युपत्र इत्यादी तपासून निर्णय राखून ठेवला होता.

भांडण कोणाबरोबर होते?मुलींना हक्क मिळण्यापूर्वी ही मालमत्ता कोणाकडे होती? पूर्वी ही मालमत्ता महारावल खेवाजी ट्रस्टकडे होती आणि ते या मालमत्तेची काळजी घेत होते. महारावल खेवाजी ट्रस्टने संपत्तीवर मृत्यूपत्राच्या आधारे हक्क सांगितला होता. पण, 2013 मध्ये चंदिगड जिल्हा न्यायालयाने हे मृत्यूपत्र बेकायदेशीर ठरवून मुलींना मालमत्ता दिली होती. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात नेण्यात आले, जिथे 2020 मध्ये जिल्हा न्यायालयाचा निर्णय कायम ठेवण्यात आला. मात्र, मुलींसोबतच त्यांच्या भावाच्या कुटुंबीयांनाही वाटा द्यावा, असे न्यायालयाने म्हटले होते.

किती मालमत्ता होती?या प्रचंड मालमत्तेत किल्ले, इमारती, शेकडो एकर जमीन, दागिने, गाड्या आणि मोठा बँक बॅलन्सचा समावेश आहे. यामध्ये फरीदकोटचा राजमहल (14 एकर), फरीदकोट किल्ला मुबारक (10 एकर), नवी दिल्लीचे फरीदकोट हाऊस (अंदाजे किंमत 1200 कोटी), चंदीगडचा मणिमाजरा किल्ला (4 एकर), शिमलाचे फरीदकोट हाऊस (260 बिघा बंगला), 18 विंटेज कार (रॉयस, बेंटले, जग्वार इत्यादी), 1000 कोटींचे सोने आणि रत्ने यांचा समावेश आहे.

टॅग्स :PunjabपंजाबSupreme Courtसर्वोच्च न्यायालय