शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकला केंद्र सरकारने विचारले प्रश्न; भारतीयांच्या डेटाचा गैरवापर झाला का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 05:46 IST

सुरक्षिततेचे काय उपाय केले?

नवी दिल्ली : भारतीयांची फेसबुकवरील माहिती चोरून गैरवापर करणाऱ्या ब्रिटनच्या केंब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीला गेल्या आठवड्यात नोटीस पाठविल्यानंतर, आता केंद्र सरकारने या प्रकरणी फेसबुकलाही नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये सरकारने फेसबुकला पाच प्रश्न विचारले असून, त्यांची उत्तरे ७ एप्रिलपर्यंत द्यावीत, असे सांगण्यात आले आहे. भारतीय मतदारांची वैयक्तिक माहिती चोरून, तिचा देशातील निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी वापर करण्यात आला आहे का, तसेच या माहितीचा गैरवापर होऊ नये, म्हणून काही उपाय योजण्यात आले आहेत का, अशी विचारणा फेसबुककडे केंद्र सरकारने केली आहे.गेल्या आठवड्यात केंब्रिज अ‍ॅनालिटिकाला पाठविलेल्या नोटिशीत केंद्र सरकारने त्या कंपनीला सहा प्रश्न विचारले होते. भारतीयांचीचोरलेली वैयक्तिक माहिती कोणत्या कारणांसाठी व कोणत्या व्यक्ती किंवा संस्थांकरिता वापरली गेली, त्यांची नावे कळवा, अशी विचारणा त्यात करण्यात आली आहे.२०१०च्या बिहार निवडणुकांसाठीजनता दल (यू) या पक्षासाठी मतदारांसंदर्भातील माहिती मिळवून देण्याचे काम, केंब्रिज अ‍ॅनालिटिकाने केले होते, असे या कंपनीतील माजी कर्मचारी ख्रिस्तोफर वायली याने बुधवारी केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे. केंब्रिज अ‍ॅनालिटिकाची पालक कंपनी एससीएलने उत्तर प्रदेशमधील जातीनिहाय केलेल्या सर्वेक्षणाची माहितीही या पक्षाने विकत घेतली होती, असेही त्याने म्हटले आहे. मात्र, वायलीने केलेल्या दाव्याचा जनता दल (यू)ने स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे.केंब्रिज अ‍ॅनालिटीकाला एका भारतीय-अमेरिकी अब्जाधीशाने निधी पुरविला होता. भारतात काँग्रेसचा पराभव व्हावा, अशी या अब्जाधीशाची इच्छा होती, असा नवा दावा ख्रिस्टोफर वायली याने आपल्या जबाबात केला आहे.

टॅग्स :FacebookफेसबुकCambridge Analyticaकेम्ब्रिज अ‍ॅनालिटिका