शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चहा विक्रीच्या कमाईतून बचत करत परदेशवारी करणाऱ्या आजोंबांचं निधन; २६ देशांची केली होती सैर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 19:33 IST

चहा विक्रीतून मिळणाऱ्या पैशांमधून ३०० रूपयांची बचत करून दांपत्य करत होतं परदेशवारी.

चहा विक्रीच्या कमाईतून पैशांची बचत करत आपल्या पत्नीसह २६ देशांची सैर करणाऱ्या आजोबांचं शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. के.आर.विजयन (KR Vijayan) असं त्यांचं नाव असून ते कोच्चीतील एका चहाच्या दुकानाचे मालक होते. ते ७१ वर्षांचे होते. ते आणि त्यांच्या पत्नी मोहना या मिळून श्री बालाजी कॉफी हाऊस नावाचं एक चहाचं दुकान चालवत असत. या ठिकाणी चहाच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून थोडी बचत करुन हे दांपत्य जगची सैर करत होतं. त्यामुळे हे सर्वांमध्ये प्रसिद्ध झाले होते. नुकतेच ते रशियाचा दौरा करून परतले होते.

हे दांपत्य चहाच्या विक्रीतून होणाऱ्या कमाईमधील दररोज ३०० रूपयांची बचत करत असतं. अशातूनच त्यांनी पैसे जमवून २००७ मध्ये पहिल्यांदा इस्रायलचा दौरा केला होता. दरम्यान गेल्या १४ वर्षांमध्ये त्यांनी २६ देशांचा प्रवास केला होता. तसंच काही वेळा त्यांनी या परदेशवारीसाठी छोटं कर्जही घेतलं होतं. या दांपत्यानं २७ वर्षांपूर्वी १९९४ मध्ये आपल्या दुकानाची सुरूवात केीली होती. कोरोना महासाथ येण्यापूर्वी या दांपत्यानं २५ देशांची सैर केली होती. तसंच यावेळी त्यांनी रशियाच्या दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला होता. हे दांपत्य २१ ते २८ ऑक्टोबर दरम्यान रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. काही दिवसांपूर्वी विजयन यांच्याशी वृत्तसंस्था एएनआयनंही संवाद साधला होता. 

"कोरोना महासाथीनंतर पर्यटन स्थळं पुन्हा सुरू करण्यात आली. जेव्हा ट्रॅव्हल एजंटनं मला पुढील दौरा हा रशियाचा असेल असं सांगितलं तेव्गा मी त्यांना या यादीत आमचंही नाव जोडण्यास सांगितलं. हा दौरा २१ ते २८ ऑक्टोबर दरम्यान असेल," असं विजयन एएनआयशी संवाद साधताना म्हणाले होते. तसंच त्यांच्या पत्नीनंही कोरोनामुळे सर्वांसमोर अनेक समस्या आल्या, परंतु आता पुन्हा प्रवासाची वेळ आहे अशी प्रतिक्रिया दिली होती.

टॅग्स :Indiaभारत