नवी दिल्ली : हिंदीतील प्रसिद्ध कवी मंगलेश डबराल (७२) यांचे बुधवारी सायंकाळी येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) निधन झाले. डबराल यांना कोरोनाची बाधा आणि न्यूमोनिया झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त त्यांचे कवी मित्र असद जैदी यांनी फेसबुकवर दिले. डबराल यांचे निधन हृदयविकाराचा झटका आल्यामुळे झाल्याचे सांगण्यात येथे डबराल साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानीत होते.
प्रसिद्ध हिंदी कवी मंगलेश डबराल निवर्तले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 04:47 IST