शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामा हल्ल्यामधील शहीदाच्या कुटुंबाची परवड, ना मिळाले 50 लाख; ना मिळाली जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 16:31 IST

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना सरकारकडून विविध आश्वासने देण्यात आली होती. मात्र...

जयपूर - 14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशात उसळलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर बालाकोट येथे एअर स्ट्राइक करून या हल्ल्याचा बदला घेण्यात आला होता. दरम्यान, या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना सरकारकडून विविध आश्वासने देण्यात आली होती. मात्र यापैकी अनेक जवानांच्या कुटुंबीयांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नसल्याचे समोर येत आहे. राजस्थानमधील हवालदार हेमराज मीणा हे पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात शहीद झाले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी राजकीय नेत्यांची रीघ लागली होती. सरकारी पातळीवरून त्यांना विविध आश्वासने देण्यात आली. त्यामध्ये शहीद हेमराजच्या पत्नीला 50 लाख रुपये रोख किंवा 25 लाख रुपये रोख आणि 25 बीघा जमीन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच शहीदाच्या आई-वडिलांना आर्थिक मदत आणि मुलांना मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन दिले गेले होते. 

मात्र घटनेला पाच महिने उलटून गेल्यानंतरही यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. सरकारी यंत्रणांच्या या  प्रवृत्तीबाबत शहीद हेमराजचे वडील हरदयाल मीणा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. '' हेमराज शहीद झाल्यानंतर असेक जण भेटायला आहे. चिंता करू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. हेमराज हा देशासाठी शहीद झालाय. पण आम्हाला तुमचा मुलगा समजा. आम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ, अशी आश्वासने त्यांनी दिली. मात्र आमची काळजी घेण्याची गोष्टच सोडा, पण नंतर कुणी साधे भेटायलाही आले नाहीत.'' अशी खंत शहीद हेमराजच्या वडिलांनी व्यक्त केली. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाGovernmentसरकारRajasthanराजस्थानIndian Armyभारतीय जवान