शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

घरात 15 गाड्या; पण एकही नाही शौचालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 13:36 IST

राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात कोटा-जयपूर राष्ट्रीय महामार्गाजवळ ३०० कुटुंबांचं हिंडोली हे गाव आहे . गावात ४० पक्की घरं आहेत. कुटुंबं सधन आहेत. ३० चारचाकी गाड्या आहेत. पण गावात लोकांच्या घरात शौचालय नाही

ठळक मुद्देराजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात कोटा-जयपूर राष्ट्रीय महामार्गाजवळ ३०० कुटुंबांचं हिंडोली हे गाव आहे.गावात ४० पक्की घरं आहेत. कुटुंबं सधन आहेत. ३० चारचाकी गाड्या आहेत. पण गावात लोकांच्या घरात शौचालय नाही.घासीलाल नाथ यांच्या कुटुंबात एकुण 10 सदस्य आहेत. गावात त्यांचं मोठं घर आहे तसंच त्या घरात टाइल्स लावलेल्या आहेत. घरात सगळ्या सुख-सुविधा आहेत पण त्या घरातील महिलांना उघड्यावर शौचास जावं लागतं

जयपूर, दि. 2- राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात कोटा-जयपूर राष्ट्रीय महामार्गाजवळ ३०० कुटुंबांचं हिंडोली हे गाव आहे. गावात ४० पक्की घरं आहेत. कुटुंबं सधन आहेत. ३० चारचाकी गाड्या आहेत. पण गावात लोकांच्या घरात शौचालय नाही.

घासीलाल नाथ यांच्या कुटुंबात एकुण 10 सदस्य आहेत. गावात त्यांचं मोठं घर आहे तसंच त्या घरात टाइल्स लावलेल्या आहेत. घरात सगळ्या सुख-सुविधा आहेत पण त्या घरातील महिलांना उघड्यावर शौचास जावं लागतं, आणि तसं करायला त्या महिलांचा काहीही आक्षेप नाही. यावर घासीलाल म्हणाले, आमच्याकडे शौचालय बांधायला पैसे नाहीत पण लवकरच शौचालय बांधण्याच्या विचारात आम्ही आहोत. शौचालय बांधायला सरकारकडून पैसे मिळविण्याच्या मुद्द्यावर घासीलाल यांना विचारल्यावर ते म्हणाले,ज्यांनी आत्तापर्यंत इथे शौचालयं बांधली आहेत त्यांना अजूनही सरकारकडून पैसे मिळालेले नाहीत. या गावात फक्त 16 घरांमध्ये शौचालय बांधण्यात आले पण शौचालय बांधण्यासाठी मिळणारी 15 हजार रूपयांची सरकारी मदत अजूनही मिळाली नाही.

पुष्कर सुवालका,चित्तर लाल सुवालका आणि नाथूजी महाराज यांनी शौचालयं बांधली पण सरकारी सहाय्यता निधी त्यांनी अजूनही मिळाली नाही. त्यासाठी आम्ही प्रमाणपत्र सादर केलं. फक्त एकदा नाही तर दोनदा प्रमाणपत्र सादर केलं. पहिल्या वेळी जेव्हा आम्ही प्रमाणपत्र घेऊन गेलो होतो तेव्हा पंचायत समितीच्या कार्यालयात प्रमाणपत्र हरवलं होतं. त्यानंतर दुसऱ्यांदा प्रमाणपत्र सादर केलं. गेल्या दोन वर्षापासून सरकारी सहाय्यता निधी मिळण्याची वाट पाहतो आहे. 

एक शौचालय बांधायला पंचवीस ते तीस हजार रूपये इतका खर्च येतो. यासाठी सरकारकडून 15 हजार रूपये निधी दिला जातो. पण तो निधी यायला ही बराच वेळ लागत असल्याचं ग्रामस्थ धन्नानाथ योगी यांनी सांगितलं आहे.  हिंडोली गावातील बाबुल योगी या व्यक्तीने त्याच्या कुटुंबियांसाठी नुकतीच एक एसयुव्ही खरेदी केली. त्याच्यांकडे आधीच 6 गाड्या आहेत पण घरात एक शौचालय नाही. घरात 10 सदस्य असून सगळे उघड्यावर शौचास जातात. या सगळ्या गाड्या कर्ज काढून घेतल्या असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. लकरच घरात शौचालय बांधणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तेथिल बाबुलाल नाथ यांच्याकडे 15 गाड्या आहेत पण घरात शौचालय नाही. 

घनश्याम योगी यांच्या घरातील द्वारिका आणि सीमा या दोघी दहावीत शिकत आहेत. आमच्या घरात लवकरच शौचालय होणार आहे, याचा आनंद आहे. उघड्यावर शौचास जायला लाज वाटायची आणि भीतीही असायची, आता तसं होणार नसल्याचं या दोघींनी सांगितलं आहे. हिंडोलीच्या सीनिअर सेकंडरी स्कूलच्या प्राध्यापकांनी त्या गावात जाऊन शौचालय बांधण्याचं त्या ग्रामस्थांना प्रोत्साहन दिलं आहे.