शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांच्या डाटा चोरीसाठी बनावट आरोग्य सेतू अ‍ॅप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 05:50 IST

कोरोना वायरसबाबत अलर्ट करण्यासाठी सरकारने आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे निर्देश दिले.

मुंबई : एकीकडे तीन कोटी भारतीयांचा तपशील डार्कनेटवर विक्रीसाठी उपलब्ध असताना, भारतीयांच्या डाटा चोरीसाठी पाकिस्तानी हॅकर्सकडून बनावट आरोग्य सेतू अ‍ॅप बनविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या मार्फत ते भारतीयांपर्यंत पोहोचवले जात आहे. त्यानुसार सायबर पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कोरोना वायरसबाबत अलर्ट करण्यासाठी सरकारने आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे निर्देश दिले. आतापर्यंत कोट्यवधी भारतीयांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. अशातच, नागरिकांचा वाढता कल लक्षात घेता, पाकिस्तानी हॅकर्सने आरोग्य सेतू अ‍ॅप सारखे बनावट अ‍ॅप तयार केले आहे. आणि व्हॉटसअ‍ॅपच्या मार्फत ते भारतीयांपर्यंत पोहोचवले जात आहे. महाराष्ट्र सायबर सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान हॅकर्सने एप्रिल २०२० मध्ये पहिले बनावट अ‍ॅप तयार केले. अनेक भारतीयांनी ते डाऊनलोडही केले होते. त्यानंतर ते अपडेट करत त्यांनी हुबेहूब असे अ‍ॅप तयार केले आहे. दोघांमध्ये साधर्म्य असल्याने नागरिकांची यात फसवणूक होत आहे. आपल्या मूळ अ‍ॅपमध्ये फाइल एक्सटेंशन ॅङ्म५.्रल्ल असे आहे. बनावट अ‍ॅपमध्ये .अस्र‘ असे नमूद आहे.आमिषांना बळी पडू नकासध्या समाजमाध्यमांवरून विविध आमिषे दाखविली जात आहेत. प्रत्यक्षात या सेवा मिळवण्यासाठी लिंक डाऊनलोड करण्याचे आवाहन केले जाते. ही लिंक डाऊनलोड केल्यास मालवेअर किंवा व्हायरसद्वारे भ्रमणध्वनी, संगणकाचा ताबा घेऊन त्यातील संवेदनशील माहिती भामटे मिळवतात. त्यामुळे अशा आमीषांना बळी पडू नका, असे आवाहन सायबर विभागाने केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या