शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडला फिल्मी स्टाईलमध्ये इम्प्रेस करण्यासाठी 'तो' झाला DSP; अशी झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 14:59 IST

एका तरुणाला आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करणं चांगलंच महागात पडलं आहे.

एका तरुणाला आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करणं चांगलंच महागात पडलं आहे. डीएसपी असल्याचं दाखवून तो खोटी छाप पाडण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याचं खोटं आता अशा प्रकारे उघड झालं की, केवळ त्याची गर्लफ्रेंडच नाही तर संपूर्ण जगाला तो डीएसपी नसल्याचं समजलं. फिल्मी स्टाईलमध्ये इम्प्रेस करण्याच्या नादात तो जेलमध्ये पोहोचला आहे. 

राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात ही घटना घडली आहे. एका तरुणाला डेप्युटी एसपीच्या गणवेशासह अटक करण्यात आली आहे. झुंझुनू शहरातील रोडवेज बस स्टँडजवळील पार्कमध्ये एक तरुण बसला होता. पोलिसांनी संशयित तरुणाच्या सामानाची आणि बाईकची झडती घेतली असता त्याच्या बॅगेत गणवेश आढळून आला, जे पाहून पोलिसांनाही धक्का बसला. या संदर्भात पोलिसांनी आरोपी तरुणाकडे चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही.

या घटनेची माहिती देताना कोतवाली पोलिस स्टेशनचे एएसआय मुलायम सिंह यांनी सांगितलं की, पकडलेल्या तरुणाचं नाव निशांत असं असून तो गर्लफ्रेंडला फिल्मी स्टाईलमध्ये इम्प्रेस करण्यासाठी डीएसपीचा गणवेश घालून शहरात फिरत होता. मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास तो आपल्या बाईकवर उद्यानाजवळ उभं राहून कोणाची तरी वाट पाहत होता.

बाईकला लावलेला स्टीकर पाहून कोणीतरी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पेट्रोलिंग हेड कॉन्स्टेबल धर्मपाल घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहताच तरुण पळू लागला मात्र तो पकडला गेला. चौकशीत त्याने सांगितलं की मैत्रिणीला इम्प्रेस करण्यासाठी हे केलं. नियम माहीत नसल्याने तो पकडला गेला. त्याने काळे शूज घातले होते. मात्र अधिकारी स्तरावर असल्यास शूज वेगळ्या रंगाचे असतात. त्यामुळेच पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि त्याची पोलखोल झाली आहे.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी