शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:35 IST

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेले फैजल खान सर यांची भेट घेतली.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे क्लास घेणारे फैजल खान हे शिक्षक सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणावरील आणि काही जुनी माहिती सांगणारे रिल्स इन्स्टाग्रामवर व्हायरल आहेत. सध्या ते बिहारमधील विधान विधानसभेच्या निवडणुका लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी खान सर यांची भेट घेतली. बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मंगळवारी पाटणा येथे पोहोचलेल्या संजय सिंह यांनी जाहीर केले की, आगामी बिहार निवडणुकीत 'आप' सर्व २४३ विधानसभा जागा लढवेल. त्यानंतर ते खान सरांच्या कोचिंग सेंटरमध्ये जाऊन त्यांना भेटले. बिहारच्या शिक्षण व्यवस्थेबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर खान सर विधानसभा निवडणुका लढवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. 

पाटण्याचे प्रसिद्ध कोचिंग शिक्षक फैजल खान उर्फ ​​खान सर हे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या शिकवण्याच्या वेगळ्या शैलीमुळे ते स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. या वर्षी बिहार लोकसेवा आयोग परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराच्या आरोपावरून पाटण्यात आंदोलन करण्यात आले. खान सरांनीही यामध्ये सक्रिय भूमिका बजावली. ते गरदानी बाग येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत अनेक वेळा दिसले.

यापूर्वीही खान सर राजकारणात येण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, त्यांनी अनेकदा याचा इन्कार केला आहे. आता बिहार निवडणुकीपूर्वी 'आप'च्या संजय सिंह यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा  राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

बिहारमधील सर्व २४३ जागा आप लढणार 

आम आदमी पक्ष यावेळी बिहारमध्ये स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवणार आहे. पक्षाने सर्व २४३ जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात संजय सिंह मंगळवारी पाटणा येथे पोहोचले. त्यांनी गरदानीबाग येथे पक्षाच्या निषेधात भाग घेतला. दिल्लीतील बिहारी लोकांच्या झोपडपट्ट्या पाडल्याच्या निषेधार्थ आपने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

टॅग्स :AAPआपBiharबिहार