शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भीमा कोरेगाव प्रकरण नियंत्रणात आणण्यास राज्य सरकारला अपयश - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 16:10 IST

पुण्यातील भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद राज्यभरात उमटल्यानंतर आता संसदेतही विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. भीमा कोरेगाव घटनेप्रकरणी विरोधकांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.

नवी दिल्ली : पुण्यातील भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद राज्यभरात उमटल्यानंतर आता संसदेतही विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. भीमा कोरेगाव घटनेप्रकरणी विरोधकांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. संसदेतील राज्यसभेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक निवेदन सादर करून भीमा कोरेगाव प्रकरणी राज्य सरकारच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.गेल्या दोनशे वर्षात जे घडले नाही ते भीमा कोरेगावमध्ये घडले. भीमा कोरेगाव प्रकरण नियंत्रणात आणण्यास राज्य सरकारला अपयश आले. याप्रकरणी राज्य सरकारने अधिक लक्ष द्यायला हवे होते, असे शरद पवारांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रात लवकरात लवकर शांतता नांदावी यासाठी सर्वपक्षीयांनी सहकार्य करावे, असे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे.शरद पवार यांच्यासह नरेश अग्रवाल, डी. राजा, कनिमोझी, संजय राऊत, अमर साबळे, संभाजी राजे छत्रपती, व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. रामदास आठवले यावेळेस बोलताना म्हणाले, ही अत्यंत निंदनीय घटना असून याचा सर्व पक्षांनी आपली राजकीय भूमिका सोडून निषेध केला पाहिजे. दरवर्षी दलितांवर हल्ले होण्याच्या 45 हजार घटना घडतात. सर्व सरकारच्या काळामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत त्यामुळे कोणत्याही एका पक्षाच्या सरकारला यासाठी दोषी धरता येणार नाही. यासाठी दोषी असणाऱ्या लोकांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे.

रामदास आठवले यांच्यानंतर राष्ट्रपती नियुक्त सदस्य संभाजी राजे छत्रपती यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण छत्रपती घराण्याचे वंशज आहोत, कृपया मला मराठीतूनही निवेदन करु द्या अशी विनंती करुन त्यांनी आपले मत मांडले. आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्ना ज्योतिबा फुले यांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी अठरापगड जाती आणि बहुजन समाजाला एकत्रित भूमिका सर्वांनी घेतली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी शांतता राखावी" अशा आशयाचे निवेदन त्यांनी केले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक करत, राज्य सरकारने अत्यंत संयमाने भूमिका घेतल्याचे सभागृहाला सांगितले. राज्यातील परिस्थिती आणखी बिघडली असती मात्र राज्य सरकारने जे केले ते ठिक केले असे राऊत यांनी सांगितले. भीमा-कोरेगाव लढाईच्या मुद्द्यावर काही लोक वारंवार याबाबत हिंदुत्त्ववादी संघटनांकडे बोट दाखवत आहेत पण पेशव्यांचा आरएसएस आणि हिंदू एकता संघटनेशी नव्हता. येथे जे झाले त्यामागे कोणीतरी अदृश्य शक्ती कार्यरत होती त्या अदृश्य हातांना शोधण्याचं काम केलं पाहिजे.

 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावParliamentसंसदSharad Pawarशरद पवार