शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

मोदी सरकारला तीन लाख कोटी खर्च करण्यात अपयश; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 04:06 IST

धक्कादायक आर्थिक अराजकाचे हे उदाहरण, अपयशामागची कारणे काय?

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकार २०१५ पासून तीन लाख कोटींपेक्षा जास्त कराची रक्कम वापरण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप काँग्रेसने सोमवारी केला. मोदी सरकारचे हे धक्कादायक, असे आर्थिक अराजक आहे, असे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला टिष्ट्वटरवर म्हणाले. प्रसारमाध्यमात आलेल्या बातमीचा आधार घेऊन सूरजेवाला यांनी दावा केला की, ‘आर्थिक वर्ष २०१५ आणि २०२० दरम्यान उपयोगात न आलेला आणि पडून असलेला एकत्रित निधी (सीएफआय) हा ३.५९ लाख कोटी रुपयांचा आहे.’ ‘हे आर्थिक अराजकाचे धक्कादायक उदाहरण आहे. २०१४-२०१५ ते २०१९-२०२० दरम्यान मोदी सरकारला तब्बल ३,५९,००० कोटी रुपयांच्या कर रकमेचा उपयोग करण्यात अपयश आले आहे. ही केवळ आर्थिक अकार्यक्षमता आहे,’ असे सूरजेवाला म्हणाले. मोदी सरकारने मारहाण केली, लाठीमार केला, परवडणारे शिक्षण द्या असे म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांवर अश्रुधुराचा वापर केला. केंद्रीय विद्यापीठांमध्ये वाढीव परीक्षा शुल्क परत देण्यास मोदी सरकारने नकार दिला व त्याचवेळी सरकार २०१४-२०१५ ते २०१९-२०२० दरम्यान उच्च शिक्षण कर म्हणून गोळा केलेले ४९,१०१ कोटी रुपये खर्च करण्यात अपयशी ठरले आहे, असे ते म्हणाले. या अपयशामागची कारणे काय आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला.हवेच्या प्रदूषणामुळे भारताचा श्वास गुदमरतो आहे, दिल्ली आणि अनेक शहरे ही गॅस चेंबर्स बनली आहेत आणि २१ व्या शतकात प्रदूषण हे एकमेव सगळ्यात मोठे आव्हान बनले आहे. तरीही मोदी सरकार २०१४-२०१५ आणि २०१९-२०२० दरम्यान स्वच्छ ऊर्जा कर म्हणून गोळा केलेल्या ३८,९४३ कोटी रुपयांचा उपयोग करू शकण्यात अपयशी ठरले आहे, असे सूरजेवाला म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी