शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

प्रेमासाठी काय पण! करणसाठी फरहीना झाली खुशबू; केलं लग्न, धर्मांतरामुळे नातेवाईक संतप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 11:12 IST

एका मुस्लिम तरुणीने प्रेम मिळवण्यासाठी धर्म बदलला आहे. तिने फक्त धर्मच बदलला नाही, तर नावही बदललं. फहरीना खातून आता खुशबू झाली असून तिने करण नावाच्या मुलाशी लग्न केलं आहे

बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एका मुस्लिम तरुणीने प्रेम मिळवण्यासाठी धर्म बदलला आहे. तिने फक्त धर्मच बदलला नाही, तर नावही बदललं. फहरीना खातून आता खुशबू झाली असून तिने करण नावाच्या मुलाशी लग्न केलं आहे. प्रेम शोधण्यासाठी तिने घरातून पळ काढला आणि हिंदू धर्म स्वीकारला असं सांगितले जात आहे. त्यानंतर हिंदू रितीरिवाजांनुसार मंदिरात त्यांचे लग्न झाले. त्याच्या धर्मांतरामुळे नातेवाईक संतप्त झाले असून तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचं सांगण्यात येत आहे.

फहरीना खातून मुझफ्फरपूरच्या करजा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या पाकडी पकोही गावातील रहिवासी आहे. तिचे गावातील एका हिंदू मुलावर प्रेम होते. या दोघांमध्ये सुमारे दीड वर्षे संबंध होतं. जेव्हा प्रेम वाढलं तेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. असं सांगितलं जात आहे की दोघांचे कुटुंबीय या नात्यासाठी तयार नव्हते. यानंतर फहरीनाने कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध हिंदू धर्म स्वीकारला आणि नंतर मंदिरात रितीरिवाजांनुसार लग्न केले.

फहरीनाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर फहरीना उर्फ ​​खुशबू तिच्या पतीसोबत पुढे आली आणि सर्वप्रथम पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्यांचा न्यायालयात जबाब नोंदवला. कोर्टात फहरीनाने सांगितलं की, तिचं अपहरण झालं नव्हतं तर ती स्वतः घरातून पळून गेली होती आणि करणसोबत होती. फहरीना म्हणाली की, तिने हिंदू धर्म स्वीकारला आणि एका मंदिरात करणशी लग्न केलं. तिला करणसोबत राहायचं आहे आणि तिला तिच्या सासरी जायचं आहे.

जीवे मारण्याच्या धमक्या 

फहरीनावर विश्वास ठेवला तर तिला तिच्या कुटुंबीयांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तिच्याविरोधात फतवा काढण्यात आला आहे. फहरीनाने सुरक्षेसाठी न्यायालयात दाद मागितली आहे. मुझफ्फरपूर न्यायालयात कलम 164 अन्वये फहरीनाचा जबाब नोंदवून तिला पतीसोबत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे प्रकरण प्रेमप्रकरणाचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दोघेही वयाने मोठे आहेत आणि एकत्र राहू शकतात. पोलिस दोघांनाही सुरक्षा पुरवणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्न