शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांचं मिशन गोवा: विधानसभेत पक्षाला विजयी करण्याचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 06:09 IST

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोवा राज्याचे प्रभारीपद

ठळक मुद्देभाजपने घटक पक्षांना सोबत घेऊन गोव्यात सरकार स्थापन केले होते.  गोव्यामध्ये विधानसभेच्या ४० जागा असून, २१ आमदारांचा पाठिंबा असलेला पक्ष तिथे सरकार स्थापन करू शकतो. 

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोव्याचे प्रभारी म्हणून भाजप नेतृत्वाने निवड केली आहे. गोव्यामध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत भाजपला विजय मिळवून देण्यासाठीची जबाबदारी फडणवीस यांना सोपविण्यात आली आहे. याआधी बिहार विधानसभा निवडणुकांत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे प्रभारी म्हणून उत्तम कामगिरी बजावली होती. 

बिहारमध्ये फडणवीस यांनी केलेल्या व्यूहरचनेनुसार भाजपने २०२० साली त्या राज्यातील निवडणुका लढविल्या होत्या. त्यामध्ये भाजपने ७० हून अधिक जागा जिंकून संयुक्त जनता दलासह पुन्हा त्या राज्यात सत्ता काबीज केली होती. मनोहर पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री असताना तिथे भाजपची निरंकुश सत्ता होती. मात्र पर्रिकर यांच्या निधनानंतर भाजपला गोव्यातील सत्ता टिकविताना बऱ्याच कसरती कराव्या लागल्या. २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १३ जागा मिळाल्या. त्यांच्या आठ जागा कमी झाल्या. भाजपने घटक पक्षांना सोबत घेऊन गोव्यात सरकार स्थापन केले होते.  गोव्यामध्ये विधानसभेच्या ४० जागा असून, २१ आमदारांचा पाठिंबा असलेला पक्ष तिथे सरकार स्थापन करू शकतो. 

धर्मेंद्र प्रधान उत्तर प्रदेशचे भाजप प्रभारीपुढील वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर पाच राज्यांच्या भाजप प्रभारींच्या नावाची त्या पक्षाने घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश या अतिशय महत्त्वाच्या राज्याच्या प्रभारीपदी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, पंजाबच्या प्रभारीपदी गजेंद्रसिंह शेखावत, उत्तराखंडची जबाबदारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींकडे तर मणिपूरच्या प्रभारीपदी केंद्रीय मंत्री भूषण यादव यांची निवड भाजप नेतृत्वाने केली आहे. या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी आठ केंद्रीय मंत्र्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. 

टॅग्स :goaगोवाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस