शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस बनणार सुपरहिरो, विराटच्या मेमोरिअलचा प्रस्ताव

By admin | Updated: March 15, 2017 21:54 IST

महाराष्ट्र सरकार विराटचं जतन करण्यासाठी पुढे सरसावलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - गेली सहा दशके समुद्रात अधिराज्य गाजवणा-या आयएनएस विराटला 2016मध्ये निरोप देण्यात आला. भारतीय नौदलाचे प्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा यांनी निवृत्त झालेल्या विमानवाहू आयएनएस विराटला चार महिन्यांच्या आत भंगारात विकण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकार विराटचं जतन करण्यासाठी पुढे सरसावलं आहे. महाराष्ट्र सरकारकडे विराटला जतन करण्यासाठी अनोखी योजना आहे, अशी माहिती एनडीटीव्हीच्या सूत्रांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा या विमानवाहू युद्धनौकेचा ताबा मिळवून पाण्याच्या आत मेमोरिअल बनवण्याचा मानस आहे. मुंबईपासून दक्षिणेकडच्या 500 किलोमीटर लांबच्या सिंधुदुर्गातील एका किना-यावर समुद्राच्या आतमध्ये हे मेमोरिअल विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्तावित मेमोरिअलला एक कृत्रिम रीफ सारखा तयार करण्यात येणार असून, त्यात तुम्हाला स्कूबा डायव्हिंग करता येईल, अशी व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. कोकणात सिंधुदुर्गासह रत्नागिरीतही पर्यटनाला चालना देण्यासाठी हे मेमोरिअल करण्याचा पर्यटन विभागाचा प्रस्ताव आहे. सहा दशके सेवेत घालवल्यानंतर निवृत्त झाल्यावर नौदलाचे प्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा यांनी कोणत्याही सरकारनं विराटचा ताबा घेऊ नये, अशी इच्छा बोलून दाखवली होती. तसेच विराटला इतर विमानवाहू नौकांसारखं समुद्रात जतन करण्यात आलं पाहिजे. जेणेकरून त्याचं संग्रहालय करता येईल, असं म्हटलं होतं. त्यानुसारच महाराष्ट्र सरकारनं विराटला विजयदुर्गजवळ 24 किलोमीटर पश्चिमेकडे अरबी समुद्रात बुडवण्यात येईल, जेथे पाणी पूर्णतः स्वच्छ असेल. या मेमोरिअलमुळे 500 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, 4000 लोकांना अप्रत्यक्षपणे उत्पन्न मिळणार आहे.