शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

व्हायरल सत्य! खरंच वायनाडमध्ये राहुल गांधींच्या समर्थनार्थ फडकावले होते पाकिस्तानी झेंडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 22:13 IST

केरळमधल्या वायनाडमधून राहुल गांधींनी लोकसभेची जागेवर निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर सोशल मीडियावर अनेकांनी टीका केली आहे.

वायनाडः केरळमधल्या वायनाडमधूनराहुल गांधींनी लोकसभेच्या जागेवरून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर सोशल मीडियावर अनेकांनी टीका केली. अनेक युजर्सनी फेसबुक आणि ट्विटवर व्हिडीओ पोस्ट केले, ज्यात काही कार्यकर्ते हिरवे झेंडे घेऊन घोषणाबाजी करताना दिसले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमधील हिरवे झेंडे हे पाकिस्तानी असल्याचीही चर्चा आहे, तसेच ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ फडकावण्यात आल्याचीही आवई उठवली गेली. परंतु या सर्व गोष्टींची पडताळणी केली असता, हे सर्व खोटं असल्याचं समोर आलं आहे. 

इंडियन युनियन मुस्लिम लीग(IUML) हा केरळमधला काँग्रेसचा मित्र पक्ष आहे. 26 मार्चला फेसबुकवर 'चौकीदार बी के मिश्रा' या नावाच्या युजर्सनं एक व्हिडीओ पोस्ट केला, 25 सेकंदांच्या या व्हिडीओला ‘न्यूज 18 मलयालम’चा लोगो लावण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये राहुल गांधींच्या समर्थनार्थ काही लोक घोषणाबाजी करत असल्याचंही समोर दिसत होतं. या व्हिडीओमध्ये काही लोकांकडून फडकावण्यात आलेल्या झेंड्यांमध्ये पांढरे स्टार आणि एक अर्धा चंद्र दिसत होता. या व्हिडीओबरोबर लिहिलं होतं की, राहुल गांधींचा वायनाड (केरळ)मध्ये पाकिस्तानी झेंड्यांसह प्रचार.आतापर्यंत या पोस्टला 1700 लोकांनी शेअर केलं. विशेष म्हणजे हा व्हिडीओ ट्विटरवरही उपस्थित आहे. युजर्स चौकीदार प्रेरणानं व्हिडीओबरोबर लिहिलं आहे की, राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढत आहेत, बघा कोण तिथे पाकिस्तानी झेंडे फडकावून आनंद साजरा करत आहेत. आताच समजलं राहुल गांधींनी हा मतदारसंघ का निवडला. अशाच प्रकारचा एक दुसराही व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओमध्येही पाकिस्तानचे झेंडे फडकत असून, मागे राहुल गांधींचा मोठा फोटोही दिसतोय.एका वृत्तसंस्थेनं यासंदर्भात 31 मार्चला बातमीही दिली होती. वायनाडमधून राहुल गांधींच्या उमेदवारीमुळे यूडीएफमध्ये जबरदस्त उत्साह, असंही लिहिलं होतं. इंडियन यूनियन मुस्लिम लीग (IUML) यांचा झेंडाही पाकिस्तानच्या झेंड्यासारखाच आहेत, परंतु या दोन्ही झेंड्यांमध्ये मोठा फरक आहे. इंडियन यूनियन मुस्लिम लीग आणि काँग्रेसची आघाडी असल्यानं त्यांनी राहुल यांना उमेदवारी मिळाल्यानंतर प्रचारादरम्यान पक्षाचे झेंडे फडकावल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या समर्थनार्थ प्रचार रॅलीमध्ये कुठेही पाकिस्तान झेंडे फडकावण्यात आलेले  नाहीत. तर ते झेंडे यूनियन मुस्लिम लीग (IUML) या पक्षाचे होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीwayanad-pcवायनाडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPakistanपाकिस्तान