शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बापरे! नोकरीचं आमिष दाखवून तरुणांना ओढलं जातंय जाळ्यात; मोदींच्या नावे होतेय फसवणूक, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 14:52 IST

Fact Check: 'Pradhan Mantri Rojgaar Yojna' Website Claiming To Offer Jobs : मोदी सरकारच्या नावाने तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवलं जात आहे. नोकरी देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून अर्जासाठी काही पैसे वसूल केले जात आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3,12,16,337 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 42,015 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,18,480 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या संकटात लोकांसाठी विविध योजना लाँच करण्यात आल्या आहेत. तसेच सरकारच्या वतीने गरजुंना, गरिबांना मदत करण्यात येत आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांनीही लोकांना मदतीचा हात दिला आहे. अशातच सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवणारे मेसेज हे व्हायरल होत आहेत. असाच एक मेसेज सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

कोरोनाच्या काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये हातावरचं पोट असणाऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. याच दरम्यान सर्वसामान्यांना नोकरीचं आमिष दाखवत त्यांची मोठी फसवणूक केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे मोदी सरकारच्या नावाने तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवलं जात आहे. नोकरी देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून अर्जासाठी काही पैसे वसूल केले जात आहे. पीएम रोजगार योजनेची फेक वेबसाईट बनवून त्या माध्यमातून फसवणूक केली जात आहे. 

पीआयबी फॅक्ट चेकने केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, https://pmrojgaaryojna.in या वेबसाईटच्या माध्यमातून विविध पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत आणि 100 रुपये नोंदणी शुल्क मागितले जात आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो देखील वापरण्यात आला आहे. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने (Press Information Bureau) व्हायरल होणारा हा मेसेज खोटा असल्याचं म्हटलं आहे. तसेच असून केंद्र सरकारने अशाप्रकारची कोणतीही घोषणा केलेली नाही असं स्पष्टीकरण पीआयबीने दिलं आहे. नोकरीच्या नावाने होणाऱ्या फसवणुकीला बळी पडू नका. अधिकृत वेबसाईटव्यतिरिक्त इतर कोणत्याही वेबसाईटवर क्लिक करणं टाळा. प्रेस इन्फोरमेशन ब्युरोने फॅक्ट चेक (PIB Fact Check) च्या माध्यमातून लोकांना सावध केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टॅग्स :jobनोकरीNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत