फेसबुकची नवी सेवा, घरबसल्या ऑर्डर करा जेवण

By admin | Published: May 23, 2017 04:02 PM2017-05-23T16:02:10+5:302017-05-23T16:03:00+5:30

लोकप्रिय सोशल मीडिया वेबसाइट फेसबुक आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी नवनवे फीचर्स लॉन्च करत असतं. आता फेसबुक आणखी एक सेवा सुरू करणार

Facebook's new service, order home made meals | फेसबुकची नवी सेवा, घरबसल्या ऑर्डर करा जेवण

फेसबुकची नवी सेवा, घरबसल्या ऑर्डर करा जेवण

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 23 - लोकप्रिय सोशल नेटवर्कींग वेबसाइट फेसबुक आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी नवनवे फीचर्स लॉन्च करत असतं. आता फेसबुक आणखी एक सेवा सुरू करणार असल्याची माहिती आहे.  फेसबुकद्वारे तुम्हाला घरबसल्या आवडीचं जेवण ऑर्डर करता येणार आहे.

गेल्यावर्षीच फेसबुकने या दिशेने पावलं उचलायला सुरूवात केली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कंपनीने डिलीव्हरी डॉट कॉम आणि स्लाइससोबत बोलणी केली होती. ही सुविधा फेसबुक अॅप आणि वेब दोघांसाठी असणार आहे. सध्या अमेरिकेतील काही ठरावीक युजर्ससाठी ही सुविधा सुरू कऱण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही सेवा भारतातही सुरू करण्यात येणार आहे. 
 
फेसबुक डेस्कटॉपमध्ये फूड ऑर्डर हे फीचर एक्सप्लोर सेक्शनमध्ये मिळेल तर अॅपमध्ये हॅमबर्गर आयकॉनवर क्लिक केल्यानंतर फूड ऑर्डर या फीचरचा वापर करता येणार आहे. येथे क्लिक केल्यानंतर जवळच्या हॉटल किंवा रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करता येणार आहे. त्यामुळे फूड ऑर्डर करण्यासाठी आता तुम्हाला दुस-या कोणत्या अॅपचा वापर करण्याची गरज नाही. 
 
फेसबुकच्या या फीचरमुळे येत्या काही दिवसांमध्ये फूड डिलीव्हरी करणा-या इतर अॅप्सला मोठ्या प्रमाणात टक्कर मिळण्याची शक्यता आहे. फेसबुकचे जास्त युजर असल्यामुळे फूड पांडा , झोमॅटो, स्विगी यासारख्या अॅपच्या तुलनेत फेसबुकचं हे फीचर लवकर लोकप्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्याचा फटका इतर कंपन्यांना बसू शकतो. 
 
नुकतंच फेसबुकने सामानाच्या खरेदी-विक्रीचा पर्यायही सुरू केला आहे. मात्र, त्याला युजर्सकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे फूड ऑर्डर सेवा सुरू झाल्यावर युजर्सकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं आता औत्सुक्याचं असणार आहे. 
 
 
 
 

Web Title: Facebook's new service, order home made meals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.