फेसबुक - जोड
By admin | Updated: May 6, 2014 16:46 IST
दुसरीने घातली लग्नाची गळ
फेसबुक - जोड
दुसरीने घातली लग्नाची गळतरुणी आयझा वरसानो या तरुणीनेही सनीला फ्रंेड रिक्वेस्ट पाठविली. सनीला आता अशा तरुणींसोबत संवाद साधने आवडू लागले होते. त्याने या तरुणीचीही फ्रंेड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली. आयझाने तर सनीसोबत व्हिडिओ चॅट करायला सुरुवात केली. तिनेही आपण एकटी असल्याचे सांगितले. सनीला तिने त्याचा मोबाईल नंबरही मागितला. सनीने काहीच विचार न करता आपला मोबाईल नंबर आयझाला दिला. आयझाच्या मोबाईलवरून सनीला मिस्ड कॉलही येऊ लागले. एकदा सनीने त्यावर कॉल केला असता त्याचे २ मिनिटांसाठी ६० रुपये बॅलेन्स कट झाले. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे या आयजा नावाच्या तरुणीने चक्क दुसर्या व्हिडिओ चॅटमध्येच सनीला थेट लग्नाचीच गळ घातली. त्यानंतर घाबरलेल्या सनीने आयझाशी चॅट करणे बंद केले. तरुणी बदलली, फ्रंेड रिक्वेस्ट सारखीचसनी यात गुंतत चालला असताना सोफिया सिमन नावाच्या आणखी एका तरुणीची फ्रंेड रिक्वेस्ट त्याला आली़ सोफियानेही डायनाप्रमाणेच सनीसोबत फेसबुकवर संवाद साधून त्याचा मेल आयडी मिळविला. त्यानंतर आश्चर्य असे की सोफियाने सनीला पाठविलेला पहिला मेल डायनाच्या मेलप्रमाणेच होता. यात थोडा बदल करून दोघींच्याही कथेचा सार एकच होता. पहिल्याच मेलमध्ये सोफियानेही सनीला आपली वैयक्तिक माहिती शेअर केली. सोफियाने तिचे वय २५ वर्षे आणि उंची ५ फूट ४ इंच असल्याचे सांगितले. अशा प्रकारे फेसबुकवर प्रेमाची दुकानदारी सुरू असून, युवक त्यात नाहक अडकत आहेत. -----