शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

सावधान! डोळे येणे हे कोरोनाचे पहिले लक्षण असू शकते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 05:09 IST

भारतात कोरोनाचे काही रुग्ण असे आहेत ज्यांना वैद्यकीय इतिहास विचारल्यावर सांगितले की, त्यांच्या आजाराची सुरुवात डोळे येण्याने झाली होती

चीनमध्ये व जगात पहिल्यांदा ‘कोरोना’बद्दल जाहीरपणे नव्या व घातक विषाणू संसर्गाला सुरुवात झाली आहे, असा सूतोवाच करणारे डॉ. ली वेनलीआंग हे नेत्रतज्ज्ञच होते. पुढे त्यांचा ही कोरोनाने मृत्यू झाला. आज दु:खाची गोष्ट म्हणजे, डोळे येणे हे कोरोनाचे पहिले लक्षण असू शकते, याबद्दल अजून अनेकांना पुरेशी माहिती नाही.

भारतात कोरोनाचे काही रुग्ण असे आहेत ज्यांना वैद्यकीय इतिहास विचारल्यावर सांगितले की, त्यांच्या आजाराची सुरुवात डोळे येण्याने झाली होती; तसेच अनेक नेत्ररोग तज्ज्ञांनी डोळे आलेल्या म्हणजे कंजक्टिवायटीस झालेल्या रुग्णांना कोरोनाची शंका व्यक्त केली व तपासणी केल्यावर कोरोनाचे निदान झाले. महाराष्ट्र आॅफथॅल्मिक सोसायटीचे राज्याचे सचिव नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. वर्धमान कांकरिया सांगतात की, सध्या साथीच्या वातावरणात डोळे आलेला रुग्ण कोरोनाचा असू शकतो ही शक्यता आहे. त्यातच जर तुमचा कोरोना रुग्णाशी संपर्क आला असेल, तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे कोरोना असल्याचे निदान झाले असेल व तुमचे डोळे आले असतील, तर हेच लक्षण कोरोनाची सुरुवात असू शकते. अजून डोळे येणे या लक्षणाची कोरोनासाठी टेस्टिंग करण्याच्या निर्देशात समावेश नसला, तरी नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तो करण्याची गरज आहे.

आपण कोरोनाची जोखीम जास्त असलेल्या वर दिलेल्या घटकात आहात का ? हे सांगावे. नेत्ररोगतज्ज्ञ वैद्यकीय इतिहास जाणून तुम्हाला कोविड रुग्णालयात जायचे का व कोरोनाची तपासणी करणे गरजेचे आहे का ? या विषयी सल्ला देतील.डोळे येण्यासाठी औषध दुकानातून प्रिस्क्रिपशन व नेत्र रोगतज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय ओव्हर द काऊंनटर डोळ्याचे ड्रॉप घेणे हे सर्रास केले जाते; पण साथीच्या या काळात व इतर वेळीही असे मुळीच करू नये. याने डोळ्यांना इजा होऊ शकते .पुढील लोकांचे डोळे आल्यास जास्त शक्यता आहे की डोळे येणे हे कोरोनाचे पहिले लक्षण आहे -डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफपोलीस, स्वच्छता कर्मचारीफिल्डवर कोरोना वार्तांकन करणारे पत्रकारथेट लोकांमध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्तेहॉटस्पॉट, कन्टेन्मेंट झोनमधील सर्व नागरिकतुमचे डोळे आले असतील, तर आपल्या नेत्र रोगतज्ज्ञांना फोन द्वारे फोटो पाठवून टेली कन्सल्टेशन घ्यावे.- अमोल अन्नदाते,(लेखक बालरोगतज्ज्ञ असून,वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या