शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

ईशान्य भारतात पूरस्थिती गंभीर: भीषण पुरामुळे आसाम, मेघालयमध्ये आणखी १२ मृत्यू, ४० लाखांहून अधिक नागरिक प्रभावित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 09:33 IST

Flood in North East: ईशान्येकडील भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे आसाम आणि मेघालयमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांमध्ये आणखी १२ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ४३ वर पाेहाेचला आहे.

गुवाहाटी: ईशान्येकडील भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे आसाम आणि मेघालयमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांमध्ये आणखी १२ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ४३ वर पाेहाेचला आहे. दाेन्ही राज्यांमध्ये सुमारे ४० लाख नागरिक प्रभावित झाले असून पूर स्थितीत सुधारणा हाेण्याचे कुठलेही संकेत नाहीत.

आसाम आणि मेघालयमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. आसाममधील २८ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. बचाव कार्यात एनडीआरएफच्या मदतीला लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे. आसाममध्ये सुमारे १.५ लाखांहून अधिक लाेकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. गुवाहाटीमध्ये शनिवारच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले. पाऊस आणि पुराचे पाणी अनेक ठिकाणी शिरल्यामुळे भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. काही रस्ते वाहून गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. 

अरुणाचल प्रदेश, मणिपूरमध्येही अशीच परिस्थिती आहे. त्रिपुरामध्ये काहीशी सुधारणा दिसून येत आहे. पावसाचा जाेर कमी झाल्यामुळे पाणीपातळीत घट हाेत आहे.

ड्राेनद्वारे पूरस्थितीचा घेणार आढावाआसाममधील पूर स्थितीचा आढावा घेण्यासाठी ड्राेनची मदत घेण्यात येणार आहे. आयआयटी गुवाहाटीने विकसित केलेल्या ड्राेनचा यासाठी वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने संस्थेला संपर्क केला आहे. सर्वाधिक फटका असलेला परिसर आणि संपर्क तुटलेल्या गावांचा आढावा घेण्यासाठी प्रामुख्याने ड्राेनचा वापर करण्यात येणार आहे.मध्य प्रदेशात काेसळधारा- मध्य प्रदेशमध्येही मान्सूनचे दमदार आगमन झाले आहे. भाेपाळ, जबलपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झाला आहे. - राज्यात पुढील काही दिवस पावसाचे असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

राजस्थानात पूर्व माेसमी पावसाने दाणादाणराजस्थानला पूर्व माेसमी पावसामुळे दाणादाण उडाली आहे. मान्सूनचे आगमन हाेण्यापूर्वीच काही नदी आणि नाल्यांना पूर आला आहे. जयपूरसह श्रीगंगानगर, हनुमानगड, जोधपूरसह १५ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

टॅग्स :floodपूरAssamआसाम