्नंरोज तीन हजार जारची जादा मागणी
By admin | Updated: March 13, 2016 00:03 IST
शहरात मागील पाच दिवसांपासून पाणीटंचाईची स्थिती आहे. जलवाहिनी खराब झाल्याने अपेक्षेनुसार पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांचे हाल झाले. यात अनेक नागरिकांनी जारचे पिण्याचे पाणी मागविले. मागील तीन दिवस रोज एकत्रीत तीन हजार जारची जादा मागणी विविध शुद्ध पाणी विक्रेत्यांकडे झाली. शहरात नऊ अधिकृत शुद्ध पाणी विक्रेते आहेत. या विक्रेत्यांतर्फे रोज १३ ते १४ हजार जारची विक्री केली जाते. ही विक्री मागील तीन दिवसांमध्ये वाढून प्रतिदिन १६ हजार जारपुढे गेली, अशी माहिती शुद्ध पाणी विक्रेते अमल चौधरी यांनी दिली.
्नंरोज तीन हजार जारची जादा मागणी
शहरात मागील पाच दिवसांपासून पाणीटंचाईची स्थिती आहे. जलवाहिनी खराब झाल्याने अपेक्षेनुसार पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांचे हाल झाले. यात अनेक नागरिकांनी जारचे पिण्याचे पाणी मागविले. मागील तीन दिवस रोज एकत्रीत तीन हजार जारची जादा मागणी विविध शुद्ध पाणी विक्रेत्यांकडे झाली. शहरात नऊ अधिकृत शुद्ध पाणी विक्रेते आहेत. या विक्रेत्यांतर्फे रोज १३ ते १४ हजार जारची विक्री केली जाते. ही विक्री मागील तीन दिवसांमध्ये वाढून प्रतिदिन १६ हजार जारपुढे गेली, अशी माहिती शुद्ध पाणी विक्रेते अमल चौधरी यांनी दिली. भाव स्थिरजारचे भाव मात्र स्थिर राहीले. ४० रुपयात २० लीटर पाण्याचे जार अनेक शहरवासीयांना घ्यावे लागले. टॅँकरसाठी ५०० रुपयेशहरात टँकरद्वारे वापराच्या पाण्याची गरज अनेकांना पूर्ण करावी लागले. ५०० ते ६०० रुपये प्रतिटँकर असा भाव त्यासाठी मोजावा लागला. काही गल्ल्यांमध्ये टँकरला शिरण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने बादल्या, हंड्याद्वारे टँकरमधील पाणी नेण्याची कसरत नागरिकांना करावी लागली. मनपाकडून चूकाच चूकाजलवाहिनी खराब झाली. ती दुरूस्त होणार नाही, असे ऐनवेळी पालिकेतर्फे प्रसिद्धी माध्यमांद्वारे सांगण्यात आले. जलवाहिनी दुरुस्तीनंतर व्हॉल्व खराब झाला. यात पाणीपुरवठा आणखी दोन पुढे ढकलावा लागला. आज, उद्या करीत पाच दिवस ही समस्या कायम राहीली. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले.