शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

LOCवर कुरापत काढणे पाकिस्तानला महागात पडले, भारतीय लष्कराने चार चौक्या आणि तीन सैनिकांना गारद केले

By बाळकृष्ण परब | Published: January 10, 2021 2:51 PM

Indian Army News : पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात येत असलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरदाखल रविवारी भारती सैनिकांनी आज मोठी कारवाई केली.

ठळक मुद्देरविवारी पाकिस्तानकडून भारताच्या हद्दीत घुसखोरीचे कारस्थान रचण्यात आले होतेभारतीय लष्कराने कुरापतखोर पाकिस्तानी सैन्यावर प्रत्यत्तरदाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे तीन सैनिक ठार भारतीय लष्कराच्या कारवाईत पाकिस्तानच्या चार चौक्या उद्ध्वस्त

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून वारंवार गोळीबार करण्यात येत असतो. मात्र आज नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराची कुरापत काढणे पाकिस्तानला चांगलेच महागात पडले. भारतीय लष्कराने कुरापतखोर पाकिस्तानी सैन्यावर प्रत्यत्तरदाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे तीन सैनिक ठार झाले. तसेच भारतीय लष्कराच्या कारवाईत पाकिस्तानच्या चार चौक्या उद्ध्वस्त झाल्या.पाकिस्तानी सैनिकांकडून नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून नौशेरा विभागाला टार्गेट करण्यात येत होते. पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात येत असलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरदाखल रविवारी भारती सैनिकांनी आज मोठी कारवाई केली. यामध्ये तीन पाकिस्तानी सैनिक मारले गेले. यादरम्यान, अनेक पाकिस्तानी सैनिक जखमी झाले.रविवारी पाकिस्तानकडून भारताच्या हद्दीत घुसखोरीचे कारस्थान रचण्यात आले होते. राजौरीमधील नौशेरा विभागात एलऔसीवर कलसिया विभागात सीमेपलीकडून दहशतवाद्यांची एक टोळी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होती. पाकिस्तानी सैन्याकडून या टोळीला कव्हर फायरिंग देण्यात येत होते. मात्र नियंत्रण रेषेवर सज्ज असलेल्या भारतीय जवानांनी हा हल्ला परतवून लावला. मात्र सध्यातरी या परिसरातील गोळीबार बंद आहे.दरम्यान, पाकिस्तानच्या सैन्याने दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा गेल्या १७ वर्षांमधील विक्रम पाकिस्तानने मोडला आहे. २८ डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीवर लक्ष टाकले तर पाकिस्तानने संपूर्ण एलओसीवर ४ हजार ७०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यासाठी पाकिस्तानने छोट्या हत्यारांसोबत मोठ्या तोफांचाही वापर केला. तसेच एलओसीच्या आसपास असलेल्या गावांनाही लक्ष्य केले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर