शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

मोफत अन्नधान्य योजनेला मुदतवाढ?; हिमाचल प्रदेश, गुजरात निवडणुकांवर डोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 05:56 IST

सध्या अन्नधान्याचा साठा पुरेसा म्हणजेच ६० दशलक्ष टन आहे; परंतु अनेक राज्यांतील प्रलयंकारी पूर व पंजाब-हरयाणा आदी राज्यांमध्ये पडलेला कमी पाऊस, यामुळे उत्पादन व खरेदीवर परिणाम होऊ शकतो.

हरिश गुप्तानवी दिल्ली : देशातील ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देणाऱ्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मोदी सरकार तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीच्या कालावधीत दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या योजनेची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यास सरकारी तिजोरीवर मोठा भार पडणार आहे. आणखी तीन महिन्यांसाठी ही योजना वाढविल्यास ५६४०० कोटी रुपयांचा खर्च वाढणार आहे. या योजनेचा एक वर्षाचा खर्च २,२७,८४१ कोटी रुपये असेल, असे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे. 

सध्या अन्नधान्याचा साठा पुरेसा म्हणजेच ६० दशलक्ष टन आहे; परंतु अनेक राज्यांतील प्रलयंकारी पूर व पंजाब-हरयाणा आदी राज्यांमध्ये पडलेला कमी पाऊस, यामुळे उत्पादन व खरेदीवर परिणाम होऊ शकतो. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आणि भू-राजकीय स्थिती खाली आणण्यासाठी केंद्र सरकारवर आधीच आर्थिक दबाव आलेला आहे. तथापि, हिमाचल प्रदेश (नोव्हेंबर) आणि गुजरात (डिसेंबर) विधानसभा निवडणुकीपर्यंत म्हणजेच किमान डिसेंबरपर्यंत या योजनेला मुदतवाढ द्यावी, असे भाजप नेतृत्वाला वाटते. ८० कोटी लोकांपर्यंत पोहोचणारी योजना बंद केल्याने दोन राज्यांच्या निवडणुकीत चुकीचा संदेश जाईल, असे नेत्यांचे मत आहे. 

पंतप्रधान घेणार अंतिम निर्णयएससीओ परिषदेवरून परतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेबाबत राजकीय दृष्टिकोनातून अंतिम निर्णय घेतील, अशी चर्चा आहे. अन्नधान्य, उर्वरके व स्वयंपाकाच्या गॅसवरील सरकारचे सबसिडी बिल आधीच चिंताजनक स्थितीत वाढले आहे. वित्त मंत्रालयातील व्यय विभाग वाढत्या वित्तीय तुटीमुळे मोफत अन्नधान्य योजनेला मुदतवाढ देण्याच्या विरोधात आहे. त्यामुळे सबसिडी बिल कमी करण्यासाठी या योजनेला मुदतवाढ देताना काही अटी घातल्या जातील, अशी शक्यता आहे. प्रत्येक तिमाहीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष महसुली वसुलीच्या वाढीमुळे सरकारचे काम आणखी सोपे होऊ शकते.