शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नियंत्रण रेषेजवळ स्फोट, दोन जवानांना वीरमरण, एप्रिल महिन्यात होणार होता विवाह, पण तत्पूर्वीच...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 09:07 IST

Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथे मंगळवारी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या आयईडी स्फोटामध्ये लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण आलं आहे.

जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथे मंगळवारी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या आयईडी स्फोटामध्ये लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी सुमारे ३.३० च्या सुमारास जम्मू जिल्ह्यातील खौर  ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या केरी बट्टल भागात नियंत्रण रेषेजवळ आयईडी स्फोट झाला. त्यात तीन जवान जखमी झाले. या जवानांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे यापैकी दोन जवानांचा मृत्यू झाला. तर एका जवानाची प्रकृती गंभीर आहे.

याबाबचत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅप्टन करमजित सिंग बख्शी यांच्या नेतृ्त्वाखाली लष्कराचं पथक या परिसरात गस्त घालत होतं. त्यादरम्यान, रिमोट कंट्रोल डिव्हाईसमधून आयईडीचा स्फोट झाला.

दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेवरील तारांच्या कुंपणाजवळ आयईडी लावून ठेवले होते. तसेच रिमोट कंट्रोल डिव्हाईसच्या माध्यमातून त्यात स्फोट  घडवण्यात आला. त्यात हे तीन जवान गंभीर जखमी झाले. पैकी दोधांचा मृत्यू झाला. या दोन्ही जवानांचं १८ एप्रिल रोजी लग्न होणार होतं. कॅप्टन करमजित सिंग बख्शी झारखंडमधील रहिवासी होते. तसेच त्यांचा विवाह १८ एप्रिल रोजी होणार होता. त्यांची होणारी पत्नी लष्करामध्ये डॉक्टर आहे.तर नायक मुकेश सिंह मन्हास हे जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांचाही साखरपुडा झाला होता. तसेच १८ एप्रिल रोजी त्यांचं लग्न होणार होतं.

दरम्यान, या स्फोटानंतर अखनूरमध्ये नियंत्रण रेषेजवळ लष्कराकडून शोधमोहिम हाती घेण्यात आली. मात्र त्यामध्ये काहीच सापडलं नाही. दहशतवादी नियंत्रण रेषेजवळ आयईडी लावल्यानंतर पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये पळून गेले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.   

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला