भिलई (छत्तीसगड), दि. १२ - स्टील प्लांटमध्ये झालेल्या विषारी वायुगळतीमुळे पाच लोक मृत्यूमुखी पडले असून ३५ जण बाधीत झाले असल्याची माहिती येथील अधिका-यांनी दिली आहे. परिस्थीती आटोक्यात आळी असून सुरक्षा यंत्रणांनी या जागेचा ताबा घेतला आहे. बाधीत लोकांपैकी ११ जणांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून इतर २३ जणांवर सामान्य विभागात उपचार सुरू असल्याची माहिती छत्तीसगडच्या मुख्य मंत्र्यांचे मुख्य सचिव श्री. ब्रजेंद्र कुमार यांनी दिली आहे.
भीलई येथे गॅस गळतीमुळे स्फोट, ५ ठार
By admin | Updated: June 13, 2014 12:40 IST