शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

चिंताजनक! H3N2 नं बदललं रूप, अचानक वाढलेल्या रुग्णांमुळे तज्ज्ञही चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 10:33 IST

देशभरात इन्फ्लूएंझा ए सब टाईप H3N2 च्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे.

देशभरात इन्फ्लूएंझा ए सब टाईप H3N2 च्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांमध्ये विषाणूच्या पॅटर्नमध्ये लक्षणीय आणि अनपेक्षित बदल झाल्याची माहिती दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील आरोग्य तज्ज्ञांनी गुरुवारी दिली. देशभरातील रुग्णालयांमध्ये H3N2 इन्फ्लूएंझाची हजारो रुग्णांची नोंद होत आहे.

H3N2 विषाणूमुळे वैद्यकीय समस्या उद्भवत आहेत, प्रामुख्यानं फुफ्फुसांच्या संसर्गाचं कारण ठरत आहेत आणि या विषाणूनं गेल्या सहा महिन्यांमध्ये आपला पॅटर्नही बदलला असल्यानं या विषाणू बाबतची चिंता वाढल्याचं मिंटनं दिलेल्या वृत्तात म्हटलंय. "गेल्या सहा महिन्यांमध्ये विषाणूच्या पॅटर्नमध्ये अनपेक्षित बदल झाले आहेत. सामान्यत: आपण इन्फ्लूएन्झारजे नंबर १ व्हायरच्या रुपात पाहतो. यावेळी इन्फ्लूएन्झा ए विशाण सब टाईप H3N2 नं श्वसन मार्गाचे अनेक संर्सग निर्माण केले आहेत," अशी प्रतिक्रिया सर गंगाराम रुग्मालयाचे सीनिअर कन्सल्टन्ट डॉ. धीरेन गुप्ता यांनी दिली.

"आणखी एक निरीक्षण- टाईप बी इन्फ्लुएंझानं एआरडीएसच्या रुपात फुफ्फुसाच्या अधिक गंभीर समस्या निर्माण केल्या आहेत. गंभीर निमोनियाला व्हेंटिलेशनची आवश्यकता असते. एडनोव्हायरस हा एक असा विषाणू आहे जो आणखी एका गंभीर आजाराला कारणीभूत ठरत आहे," असं डॉ. गुप्ता म्हणाले.

“गेल्या २ महिन्यांत, एडिनोव्हायरसमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे ज्यामुळे रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करावं लागत आहे (दोन महिन्यांत ११ रुग्णांना PICU ची आवश्यक होती.)" अशी माहितीही त्यांनी दिली. डीएनए विषाणू मुख्यत्वे वरील श्वसन प्रणालीवर परिणाम करतात आणि डोळ्यांच्याही समस्या निर्माण करतात. याचा प्रसास करोनाप्रमाणेच होतो," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

६० उपप्रकारएडेनोव्हायरस एक डीएनए विषाणू आहे, ६० पेक्षा जास्त उपप्रकारांसह, गंभीर आजारांना सेरोटाईप ७, १४, सेरोटाईप १५,२१,१४ शी संबंधित आहे. प्रामुख्याने वरच्या श्वसनमार्गावर आणि डोळ्यांवर याचा परिणाम होतो. इम्युनोकॉम्प्रोमाइज्डमध्ये हे न्यूमोनियाचे कारणही ठरू शकते. विशेष म्हणजे तो कोरोनासारखाच वेगानं पसरतो. पूर्वी असं वाटलं होतं की हा विषाणू प्रामुख्यानं दोन वर्षांपेक्षा कमी काळासाठी प्रभावित करतो, परंतु या वर्षी त्याचं रुप निराळं होतं, सिडोफोव्हिरचा उपयोग इम्युनोकॉम्प्रोमाइज्डमध्ये प्रोगरेसिव्ह आजारांत केला जाऊ शकतो, असं ते म्हणाले.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या