शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

१00 रुपये कमाईसाठी होतो १११ रुपयांचा खर्च; रेल्वेचे गणित बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 06:56 IST

कर्मचारी वेतन, वाढीव पेन्शनमुळे बोजा वाढला

नवी दिल्ली : दमडीची कोंबडी अन् रुपयाचा मसाला, अशी मराठीत म्हण आहे. हिंदीत ती म्हण आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या अशी आहे. त्या नावाचा एक चित्रपटही आला होता. भारतीय रेल्वेची स्थितीही काहीशी अशीच आहे. रेल्वेला यावर्षी एप्रिल ते जुलै या महिन्यांमध्ये १00 रुपये कमावण्यासाठी १११ रुपये ५१ पैसे इतका खर्च करावा लागल्याचे उघडकीस आले आहे.रेल्वेचा महसूल ज्या प्रमाणात वाढत आहे, त्याहून खर्च अधिक असल्याचा हा परिणाम आहे. अशा आतबट्ट्याच्या व्यवहारामुळेच रेल्वे आर्थिकदृष्ट्या अडचणीत येत आहे. रोजंदारीवरील कामगारांचे वेतन आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे वाढीव पेन्शन यांमुळे रेल्वेचा ताळेबंद बिघडला आहे. जमा व खर्चाचे गणितच जुळेनासे झाल्याने रेल्वेला आपले लक्ष्यच पूर्ण करणे अशक्य झाले आहे.यंदाच्या अर्थसंकल्यात एप्रिल ते जुलै या काळात मालवाहतुकीतून ३९ हजार २५३ कोटी ४१ लाख रुपये इतके उत्पन्न मिळविण्याचे लक्ष्य रेल्वेने निश्चित केले होते. प्रत्यक्षात ते साध्य झाले नाही आणि या काळात मिळाले ३६ हजार ४७0 कोटी ४१ लाख रुपये इतकेच उत्पन्न. प्रवाशांकडून या चार महिन्यांत १७ हजार ७३६ कोटी ९ लाख रुपये इतके उत्पन्न मिळविण्याचे रेल्वेने ठरविले होते. त्याऐवजी रेल्वेला मिळवता आले केवळ १७ हजार २७३ कोटी ३७ लाख रुपये. म्हणजेच रेल्वेला मालवाहतूक व प्रवासी भाडे यांतून ठरलेल्या लक्ष्यापेक्षा कमीच उत्पन्न मिळाले. या चार महिन्यांमध्ये रेल्वेने जो खर्च अपेक्षित धरला होता, त्याहून तो अधिकच झाला. रेल्वेनेच दिलेल्या माहितीनुसार या काळात ५0 हजार ४८७ कोटी ३६ लाख इतका खर्च अपेक्षित होता. मात्र प्रत्यक्ष झालेला खर्च होता ५२ हजार ५१७ कोटी ७१ लाख रुपये. रेल्वे कर्मचाºयांचे नियमित वेतन, रोजंदारीवरील कर्मचाºयांचे पगार, निवृत्ती वेतन या साºया खर्चात वाढ झाल्याचा हा परिणाम आहे.विस्तारावरही मर्यादाउत्पन्नापेक्षा खर्च वाढत चालल्याने रेल्वेला विस्तार करणे अवघड होत आहे. तसेच रेल्वेचे नवे डबे बांधण्यावर बंधने येत आहेत.पूर्वी रेल्वेचा स्वतंत्र खर्च असायचा. आता मात्र देशाच्या अर्थसंकल्पातच रेल्वेचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेच्या स्थितीची नीट माहिती समोर येत नाही. पण या प्रकारामुळे रेल्वे किती अडचणीत आहे, हे मात्र स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :railwayरेल्वे