शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

१२३ संस्थांमधील विद्यमान संचालकांना मुदतवाढ

By admin | Updated: May 12, 2014 19:05 IST

कागल : जहाँगीर शेख : राज्य शासनाने पहिल्यांदा ओला आणि नंतर सुका दुष्काळ पडल्याच्या कारणावरून सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्याने कागल तालुक्यातील १२३ संस्थांमधील विद्यमान संचालकांना मुदतवाढ मिळाली आहे. डिसेंबर २०११ पासून डिसेंबर २०१३ पर्यंतच्या या मुदत संपलेल्या संस्था आहेत.

कागल : जहाँगीर शेख : राज्य शासनाने पहिल्यांदा ओला आणि नंतर सुका दुष्काळ पडल्याच्या कारणावरून सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्याने कागल तालुक्यातील १२३ संस्थांमधील विद्यमान संचालकांना मुदतवाढ मिळाली आहे. डिसेंबर २०११ पासून डिसेंबर २०१३ पर्यंतच्या या मुदत संपलेल्या संस्था आहेत.
या १२३ संस्थांमध्ये जवळपास ६१ विकास सेवा संस्था आहेत. कोल्हापूर जिल्‘ातील शेती कर्जमाफी रद्द होऊन जिल्हा बँकेने सेवा संस्थांकडून कर्जमाफीच्या रकमा कपात करून घेऊन आपली बाजू सुरक्षित केली. मात्र, यामुळे या विकास सेवा संस्थांचे संचालकपद म्हणजे या संचालकांना भिजलेले घोंगडे गळ्यात पडल्यासारखे वाटत आहे. त्यातून आता कर्जवसुलीसाठी शेती लिलावासारख्या प्रक्रिया कराव्या लागणार असल्याने शेतकर्‍यांच्या दारात जाण्याचे हे कामही संचालक मंडळाला नकोसे वाटत आहे. एकदा निवडणूक लागून हा विषय संपावा, अशी इच्छा असताना आता लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. यापूर्वी या संस्थांच्या निवडणुका व्हाव्यात, अशी मागणी होत आहे. सेवा संस्थांव्यतिरिक्त दूध संस्था, पतसंस्था, इतर संस्थांचे संचालक मंडळ मात्र मुदतवाढ मिळत असल्याने आनंदात आहेत. काही संस्थांनी तर परस्परच अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निवडी करून पदे भूषविण्याची हौस भागवून घेण्याचा सपाटा लावला आहे. बदललेल्या सहकार नियमांचा अभ्यास करून त्या पद्धतीने सभासद संख्याबळ तयार करण्याचा अवधीही यामुळे मिळाला आहे. शासन या निवडणुकांना कधी परवानगी देणार याकडे सहकार वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. ज्या संस्था राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावांतील आहेत, तेथील सभासद-कार्यकर्ते वारंवार सहकार दुय्यम निबंधक कार्यालयात येऊन निवडणूक तारखांबद्दल विचारणाही करीत आहेत.