शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2024 08:35 IST

हरयाणातील अंदाज सपशेल फसले, जम्मू-काश्मीरमध्ये बसले; निम्म्यापेक्षा जास्त अंदाज चुकले

मनोज रमेश जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : हरयाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकींचे एक्झिट पाेल जाहीर झाले हाेते. त्यात हरयाणात काॅंग्रेस तर जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल काॅन्फरन्स व काॅंग्रेस आघाडीचे सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला हाेता. मात्र, हरयाणाच्या बाबतीत एक्झिट पाेल पूर्णपणे आपटले. तर जम्मू-काश्मीरबाबत सरकार काेणाचे येणार, हा अंदाज खरा ठरला, तरीही बरेच अंदाज चुकले आहेत.

हरयाणामध्ये भाजपचा दारुण पराभव हाेईल आणि काॅंग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीचे सरकार येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला हाेता. nमात्र, प्रत्यक्षात झाले उलट. भाजपने बहुमत मिळविताना सलग तिसऱ्यांदा सत्ताकायम ठेवण्याचा इतिहास हरयाणात घडविला आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर निवडणूक झाल्यामुळे या निकालाबाबत उत्सुकता हाेती. कलम ३७० हटविल्यानंतर ही पहिलीच निवडणूक हाेती. एक्झिट पाेल्सनी नॅशनल काॅन्फरन्स-काॅंग्रेस आघाडीचे सरकार स्थापन हाेईल, असा अंदाज वर्तविला हाेता. ताे खरा ठरला आहे. मात्र, भाजपला मिळणाऱ्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले आहेत.

हरयाणा विधानसभा 

एकूण जागा - 90 I बहुमत - 46

सर्व्हे करणारी संस्था    भाजपसहित    काँग्रेससहित     अन्य    एनडीए    इंडिया आघाडी    ध्रुव रिसर्च    २७    ५७    ०-६सीएनएन२४    २१    ५९    १०रिपब्लिक मॅट्रिज    १८-२४    ५५-६२    २-५पीपल्स-पल्स    २०-३२    ४९-६१    ०-५इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडिया    २१    ५९    २-६डेटाअंश-रेड माईक    २०-२५    ५०-५५    ०-४मनी कंट्रोल    २४    ५८    ६प्रत्यक्ष निकाल    ४८    ३७    ५

जम्मू-काश्मीर विधानसभा

एकूण जागा - 90 I बहुमत - 46

सर्व्हे करणारी     भाजप    काँग्रेस, नॅशनल    पीडीपी    अन्यसंस्था        कॉन्फरन्स आघाडी        एबीपी-सी व्होटर्स    २७-३२    ४०-४८    ६-१२    ६-११रिपब्लिक मॅट्रिज    २५    २७    २८    ७पीपल्स-पल्स    २३-२७    ४६-५०    ७-११    ४-६मनी कंट्रोल    २६    ४०    ७    १७प्रत्यक्ष निकाल    २९    ४८    ३    १०

जम्मू-काश्मीर विधानसभेच्या ९० जागांसाठी झालेल्या निवडणुकांत जर त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल, असाही अंदाज काही संस्थांनी वर्तविला हाेता. ताे देखील चुकीचा ठरला.

 

टॅग्स :exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीharyana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४jammu and kashmir assembly election 2024जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४