शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

‘एक्झिट पोल’ने साधला समतोल! पश्चिम बंगालमध्ये मात्र अंदाज चुकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 05:55 IST

बहुतांश निष्कर्ष ठरले खरे, पश्चिम बंगालमध्ये मात्र अंदाज चुकला

ठळक मुद्देकोरोनाचे सावट देशावर अधिक गडद झाले असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दुकलीने बंगाल निवडणुकीच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा अखेरचा टप्पा संपताच जाहीर झालेल्या मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांमध्ये (एक्झिट पोल) अनेकांनी भाजपला आसामात सत्ता राखता येईल, असे सांगतानाच इतरत्र हा पक्ष मुसंडी मारेल, असा अंदाज वर्तवला होता. बंगालमध्ये तर भाजपला १०० हून अधिक जागा मिळून सत्तेच्या समीप हा पक्ष जाईल, असेही भाकीत करण्यात आले होते. परंतु निकालात भाजपला ७५ जागांवरच समाधान मानावे लागले.  कोरोनाचे सावट देशावर अधिक गडद झाले असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दुकलीने बंगाल निवडणुकीच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिले होते. भाजपचा प्रचाराचा झंझावात आणि मोदी-शहा यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून झाडून साऱ्या सर्वेक्षण संस्थांनी निष्कर्षांत बंगालात भाजप १०० हून अधिक जागा पटकावेल, असा अंदाज व्यक्त केला होता. 

तामिळनाडूत सत्तेचा लंबक कधी अण्णाद्रमुक तर कधी द्रमुककडे झुकतो. यावेळी जनतेने पसंती द्रमुकला दिली. तामिळनाडूत पाच वर्षांनी सत्तापालट होतो. एक्झिट पोल्सनी वर्तवलेले भाकीत इथे ठरले. भाजपचे अण्णाद्रमुकशी युती करून दक्षिणेत चंचूप्रवेश करण्याचे स्वप्न पुन्हा भंगले. 

मल्याळी जनतेने मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्या नेतृत्वावर विश्वासाची मोहोर उमटवली आहे. केरळात सत्तापालट होणार नाही. माकपप्रणीत एलडीएफ पुन्हा विजयी होईल, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला होता. तो खरा ठरला असल्याचे चित्र आहे. 

मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या कारभारावर आसामी जनता खूश असून, त्यांच्याचकडे पुन्हा एकदा सत्तेची दोरी आसामी जनतेने सोपवली आहे. आसामात भाजप सत्ता राखेल, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला होता. तो खरा ठरला असला तरी काँग्रेसनेही चांगली लढत दिल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट होत आहे. 

पुदुच्चेरीत एन. रंगास्वामी यांच्या स्थानिक काँग्रेस पक्षाशी भाजपने हातमिळवणी केली आहे. त्यात अण्णाद्रमुकचाही समावेश आहे. या आघाडीने पुदुच्चेरीत १५ जागांवर आघाडी घेत सत्तेसाठी दावा केला आहे. काँग्रेस व स्थानिक आघाडीत रस्सीखेच होईल, असा अंदाज पोलमध्ये वर्तविण्यात आला होता.

पश्चिम बंगालमध्ये लागलेल्या निवडणूक प्रत्यक्ष निकालात भाजपला ७५ जागांवरच विजय नोंदवता आला असून, ममतांच्या तृणमूल काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे.    

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालcorona virusकोरोना वायरस बातम्याElectionनिवडणूक