शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एक्झिट पोलचे भाकीत; गुजरातमध्ये मोदींचा करिष्मा कायम, ‘आप’ तळात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 08:00 IST

भाजप राखणार गड, काँग्रेस दुसऱ्या स्थानी, हिमाचलमध्ये सत्तेसाठी टसल

नवी दिल्ली : गुजरातमध्ये भाजप हा काँग्रेस, आपचा धुव्वा उडवून पुन्हा सत्ता काबीज करणार असल्याचा निष्कर्ष विविध एक्झिट पोलमधून काढण्यात आला आहे. भाजपनंतर सर्वाधिक जागा काँग्रेस जिंकणार असून, आप पक्षाचा दारुण पराभव होणार असल्याचे चित्र यातून उभे राहिले आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला सत्ता कायम राखण्यात यश मिळणार असले तरी तिथे काठावरचे बहुमत मिळेल, असे भाकीत वर्तविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजप सातव्यांदा सत्तेवर येणार असल्याचा अंदाज पोल चाचण्यांनी वर्तविला आहे. 

हिमाचलमध्ये सत्ता राखण्यात यश?हिमाचल प्रदेशमध्ये भाजप ३७ जागांवर विजय मिळविण्याची शक्यता आहे, असा बहुतांश एक्झिट पोलचा निष्कर्ष आहे. त्याखालोखाल काँग्रेसला सर्वाधिक ३० जागा मिळतील. आपचा या राज्यात दणदणीत पराभव होण्याची शक्यता आहे. 

भाजपला सरासरी १०० जागागुजरातमध्ये भाजपला किमान ८१ ते कमाल १५१, काँग्रेस व मित्रपक्षांना किमान १६ व कमाल ५१ जागा मिळतील, असे भाकीत आहे. २०१७ मध्ये भाजपला ९९ व काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या. यंदाच्या भाजप सरासरी १०० हून अधिक जागा जिंकणार असल्याचे व काँग्रेसच्या जागांमध्ये मोठी घट होणार असल्याचे म्हटले आहे.

गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात ५८.८ टक्के मतदानगुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील ९३ जागांसाठी सोमवारी सायंकाळी पाचपर्यंत सरासरी ५८.८ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका तसेच पाच राज्यांतील सहा विधानसभा जागा, लोकसभेची एक जागा यासाठी झालेल्या पोटनिवडणुका यांची मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार असून त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येतील.

‘आप’चा प्रभाव नाही : ‘आप’ला गुजरातमध्ये १० पेक्षा कमी व हिमाचल प्रदेशमध्ये एकही जागा मिळणार नाही, अशी शक्यता असल्याचे एक्झिट पोलच्या निष्कर्षात वर्तविण्यात आली आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात