शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Exit Poll 2022: पाचपैकी तीन राज्यांत भाजपा, तर पंजाबमध्ये आप मुसंडी मारणार, तर गोव्यात त्रिशंकू चित्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 21:19 IST

Exit Poll 2022: उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांसाठीचे विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांसाठीचे विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. यामधील बहुतांश एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात भाजपाला तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला बहुमत मिळेल असा कल वर्तवण्यात आला आहे. तर मणिपूरमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. मात्र  उत्तराखंड आणि गोवा  या राज्यांसाठी विविध एक्झिट पोलमधून वेगवेगळा कल दर्शवण्यात आला आहे. दरम्यान, इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार पाच पैकी उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये तीन राज्यांत भाजपाला सत्ता मिळण्याची शक्यता आहे. तर पंजापमध्ये आपला बहुमत मिळू शकते. तर गोव्यात काँग्रेस मोठा पक्ष ठरेल, मात्र तिथेही त्रिशंकू विधानसभेची शक्यता आहे.

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला ४०३ पेकी २८८-३२६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर समाजवादी पक्षाला ७१ ते १०१ जागा मिळू शकतात. बहुजन समाज पक्षाला ३ ते ९ जागा मिळू शकतात तर इतरांना ३ ते ६ जागा मिळू शकतात.

तर या एक्झिट पोलनुसार उत्तराखंडमध्येही भाजपा सत्ता राखण्याची शक्यता आहे. येथे भाजपाला ३६ ते ४६, काँग्रेसला २० ते ३०. आपला शून्य तर इतरांना ४ ते ९ जागा मिळू शकतात.

पंजाबमध्ये या एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्ष प्रचंड बहुमतासह सत्तेत येण्याची शक्यता आहे. आपला पंजाबमध्ये ७६ ते ९० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला १९ ते ३१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांची निराशा होण्याची शक्यता आहे.

मणिपूरमध्येही भाजपाची सत्ता कायम राहण्याची शक्यता या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार भाजपाला साठ पैकी ३३ ते ४३ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ४ ते ८ जागा मिळण्याची शक्यता आहे.

मात्र या एक्झिट पोलनुसार गोव्यामध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोलनुसार भाजपाला १४ ते १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला १५ ते २० जागा मिळण्याची शक्यता आहे. मगोपला २ ते ५ जागा मिळण्याची शक्यता आहे. आपलाही २ ते ५ जागा मिळण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२Uttarakhand Assembly Election 2022उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२