शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

फाशी ढकलली जाणे, हे व्यवस्थेचे अपयश, निर्णयावर निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 06:06 IST

पवन कुमारने केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने सकाळी फेटाळताच सत्र न्यायालयाने फाशीच्या स्थगितीसाठीचा आधी केलेला अर्जही फेटाळला.

नवी दिल्ली : निर्भया प्रकरणात शिक्षा झालेल्या चौघांपैकी पवन कुमारने केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने सकाळी फेटाळताच सत्र न्यायालयाने फाशीच्या स्थगितीसाठीचा आधी केलेला अर्जही फेटाळला. मात्र पवन कुमारने लगेच राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला व त्याआधारे स्थगितीसाठी नवा अर्ज केला गेला. एकदा डेथ वॉरंट काढल्यानंतर पुन्हा पुन्हा फाशी पुढे ढकलली जाणे, हे व्यवस्थेचे अपयश आहे, अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने व्यक्त केली.पब्लिक प्रॉसिक्युटर इरफान अहमद व ‘निर्भया’च्या पालकांच्या वतीने अ‍ॅड. इंदर कुमार झा यांनी फाशी स्थगित करण्यास विरोध केला. राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला असला तरी या टप्प्याला न्यायालयाने फाशी स्थगित करण्याची गरज नाही. तसा अधिकार न्यायालयास नाही. राष्ट्रपतींचा निर्णय होईपर्यंत फाशी स्थगित राहील. पण तो निर्णय सरकारच्या पातळीवरचा असेल, असे त्यांचे म्हणणे होते. दिल्ली उच्च न्यायालयाने या चारही खुन्यांना सर्व कायदेशीर मार्ग एक आठवड्यात अनुसरण्याचा आदेश ५ फेब्रुवारी रोजी दिला होता. परंतु पवनने मुदत टळून गेल्यानंतर अर्ज केल्यानंतर त्याची दखल घेण्याची गरज नाही, असेही त्यांचे म्हणणे होते. हा युक्तिवाद अमान्य करताना सत्र न्यायाधीश राणा यांनी तुरुंग नियमावलीचा दाखला दिला. दयेचा अर्ज फेटाळल्यानंतरही फाशी १४ दिवसांनंतर देण्याचे बंधन नियमांत आहे. दयेचा अर्ज हा राज्यघटनेने फाशीच्या कैद्याला दिलेला अधिकार आहे. अर्ज उशिराने केला म्हणून, तो हक्क हिरावला जाऊ शकत नाही, असे त्यांनी नमूद केले.>न्यायाधीश म्हणाले...न्या. राणा यांनी ऐनवेळी दयेचा अर्ज करण्यावरून पवन कुमारचे वकील अ‍ॅड. सिंग यांना धारेवर धरले. ‘तुम्ही आगीशी खेळत आहात. कोणाहीकडून जरी चूक झाली तर त्याचे काय परिणाम होतील याचा विचार करा. नियमांचे उल्लंघन करून फाशी दिलेल्या माणसाचे प्राण पुन्हा आणता येत नाहीत’, असे ते म्हणाले.पीडितेच्या कुटुंबियांनी जोरदार विरोध केला असला, तरी कायद्याने उपलब्ध असलेले सर्व मार्ग अनुसरण्याची संधी न्यायसंस्थेने नाकारली, अशी खंत उराशी बाळगून प्राण सोडण्याची वेळ फाशीच्या कैद्यावरही येऊ नये, असे मला ठामपणे वाटते.- धर्मेंद्र राणा,अतिरिक्त सत्र न्यायाधीश

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेप