Exchange of fire underway between terrorists and security forces in Gopalpora area of Kulgam | जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, चकमक सुरुच
जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, चकमक सुरुच

कुलगाम : जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच, काही दहशतवादी या परिसरात लपल्याची माहिती असून जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. 

कुलगाममधील गोपालपोरामध्ये रात्री उशिरापासून सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास सुरक्षा रक्षकांना यश आले आहे. तर, गोपालपोरा परिसरात लपलेल्या आणखी काही दहशतवाद्यांचा शोध सुरक्षा रक्षकांकडून सुरु आहे. 


दरम्यान,  दोन दिवसांपूर्वी पुलवामात मध्यरात्री सव्वा दोनपासून सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. केंद्रीय राखीव पोलीस दल, राष्ट्रीय रायफल्स आणि स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप यांनी संयुक्त कारवाई करत दहशतवाद्याला घेरले होते. यानंतर सुरू झालेल्या चकमकीत एका दहशवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले होते. चकमक संपल्यानंतर जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. तेव्हा दहशतवाद्याचा मृतदेह हाती लागला. पुलवामासोबतच दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू होती. 


(Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद)


 


Web Title: Exchange of fire underway between terrorists and security forces in Gopalpora area of Kulgam
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.