शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

दिल्लीमध्ये जादा ऑक्सिजनची होते काळ्या बाजारात विक्री, केंद्र सरकारचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 06:10 IST

केंद्र सरकारच्या यंत्रणांनी दिल्लीतील ६२ महत्त्वाची शासकीय रुग्णालये तसेच ११ ऑक्सिजन भरणा केंद्रांमध्ये नुकतेच एक सर्वेक्षण केले.

नवी दिल्ली : दिल्लीला गरजेपेक्षा अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. मात्र त्याचा अकार्यक्षमतेने वापर सुरू आहे. दिल्लीत ऑक्सिजनच्या जादा साठ्याची काळ्या बाजारात विक्री केली जाते, असा खळबळजनक आरोप केंद्र सरकारने केला आहे.केंद्र सरकारच्या यंत्रणांनी दिल्लीतील ६२ महत्त्वाची शासकीय रुग्णालये तसेच ११ ऑक्सिजन भरणा केंद्रांमध्ये नुकतेच एक सर्वेक्षण केले. त्यात असे आढळून आले की, दिल्लीतील ऑक्सिजनचा जादा साठा दुसरीकडे वळविला जात असल्याने त्याचे परिणाम या वायूच्या राष्ट्रीय स्तरावरील वितरणावरही होत आहेत. दिल्लीला असलेली ऑक्सिजनची गरज, त्या वायूचे वितरण व प्रत्यक्ष वापर याची काटेकोर तपासणी करून घेण्यासाठी केजरीवाल सरकार राजी नाही, असे केंद्र सरकारच्या सूत्रांनी सांगितले.दिल्लीमध्ये  ऑक्सिजनचा पुरवठा होऊनही जर त्या वायूची कमतरता जाणवत असेल तर याचा अर्थ दिल्ली सरकारमधील मंत्री काहीतरी गडबड करत असावेत, असा केंद्र सरकारचा आरोप आहे. दिल्लीतील ऑक्सिजन सिलिंडर ताब्यात ठेवल्याबद्दल तेथील अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री इम्रान हुसैन यांना दिल्ली उच्च न्यायालयाने  नोटीस बजावली होती. 

पुरवठ्यामध्ये ५० टक्के वाढकेंद्र सरकारच्या सर्वेक्षणानुसार दिल्लीतील रुग्णालये तसेच भरणा केंद्रातील ऑक्सिजनचे प्रमाण गेल्या दोन दिवसांत ५० टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे. सध्या दररोजच्या गरजेपेक्षा १.२ पट ऑक्सिजनचा साठा दिल्लीत उपलब्ध आहे. काही रुग्णालयांकडे चार-पाच दिवस पुरेल इतका ऑक्सिजन आहे. ५ मेपासून ऑक्सिजनचा तुटवडा आहे अशी एकही तक्रार संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत आलेली नाही. दिल्लीचे अनुकरण करत राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर या राज्यांनीही ऑक्सिजनचा अधिक प्रमाणात पुरवठा करावा, अशी मागणी केंद्राकडे केली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनCorona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकार