शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बँक भरती परीक्षा आता मराठीतूनही होणार; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 14:43 IST

बँकांच्या परीक्षा मराठीसह तेरा भाषांमधून होणार

नवी दिल्ली: विभागीय ग्रामीण बँकांच्यापरीक्षा मराठीसह तेरा भाषांमधून घेण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. ग्रामीण बँकांच्यापरीक्षा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनकडून (आयबीपीएस) घेतल्या जातात. सध्या इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये या परीक्षा होतात. बँकांच्या परीक्षा यापुढे मराठीसह आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, कोकणी, मल्याळम, मणीपुरी, ऊडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू भाषेत होतील. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत ही माहिती दिली. 'स्थानिक तरुणांना योग्य संधी मिळावी, त्यांना रोजगार मिळावा यासाठी बँकांच्या परीक्षा 13 प्रादेशिक भाषांमध्ये होतील. विभागीय ग्रामीण बँकांमधील अधिकारी आणि सहाय्यक पदांच्या परीक्षांमध्ये हा पर्याय उपलब्ध असेल,' असं सीतारामन म्हणाल्या.बँकांच्या परीक्षा स्थानिक भाषेत घेतल्या जाव्यात अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरू होती. हा विषय ट्विटरवरदेखील ट्रेंडमध्ये होता. बँकांमधील पदं भरताना स्थानिक भाषेवर प्रभुत्व असावं अशी अट असते. मात्र तरीही बँकांच्या परीक्षा केवळ हिंदी आणि इंग्रजीमध्ये होतात, अशी तक्रार अनेकांनी केली होती. प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा होत नसल्यानं अनेक पात्र उमेदवार बँकेतील नोकऱ्यांपासून दूर राहतात, असं मतदेखील अनेकांनी व्यक्त केलं होतं. गेल्या गुरुवारी काँग्रेस खासदार जी.सी. चंद्रशेखर यांनी बँकेच्या परीक्षा स्थानिक भाषांमध्ये घ्याव्यात अशी मागणी केली होती. कन्नड भाषेतून भाषण करत त्यांनी ही मागणी केली होती. याची दखल घेत सरकारनं बँक भरती परीक्षा 13 भाषेतून घेणार असल्याची घोषणा केली.

टॅग्स :bankबँकexamपरीक्षा