शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

EVM मशीनमध्ये बिघाड नव्हता, मुख्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 14:14 IST

सोमवारी झालेल्या 4 लोकसभा आणि 10 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतच्या मतदानादरम्यान इव्हीएम मशीन खराब झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. मात्र इव्हीएममध्ये बिघाड असल्याचे वृत्त मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी फेटाळून लावले आहे.

नवी दिल्ली -  सोमवारी झालेल्या 4 लोकसभा आणि 10 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतच्या मतदानादरम्यान इव्हीएम मशीन खराब झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. मात्र इव्हीएममध्ये बिघाड असल्याचे वृत्त मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी फेटाळून लावले आहे. सोमवारी पोटनिवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या इव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड नव्हता. मात्र पहिल्यांदाच वापर करण्यात आलेल्या व्हीव्हीपॅट मशीनबाबत काही ठिकाणांहून तक्रारी आल्या होत्या," असे ओ. पी. रावत म्हणाले. 

लोकसभेच्या ४ व विधानसभेच्या १0 अशा १४ जागांसाठी सोमवारी शांततेत मतदान पार पडले असले, तरी पालघर, गोंदिया-भंडारा व यूपीतील कैराना लोकसभा मतदार संघांत ईव्हीएम (मतदान यंत्रे) बंद पडण्याचे, त्यात गडबड केल्याचे व विरोधी उमेदवारासमोरील बटन दाबले जात नसल्याच्या इतक्या तक्रारी आल्या की, ही यंत्रे म्हणजे भाजपाचे षड्यंत्र असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. मात्र, काही यंत्रांमध्ये कडक ऊन आणि धुळीमुळे बिघाड झाल्याचे पालघरच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पालघरमध्ये तब्बल २७६ मतदानयंत्रे बंद पडली, तर भंडारा-गोंदियामध्ये ७५ बुथवरील मतदानयंत्रे काम करीत नसल्याच्या १४१ तक्रारी आल्या. यंत्रे बंद पडल्याने अनेक मतदारांना परत जावे लागले. जिथे ही यंत्रे बंद पडली, तिथे दुसरी बसविली, तिथे मतदानास अधिक वेळ देत आहोत, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले, पण घरी निघून गेलेले लोक अनेक ठिकाणी पुन्हा मतदानाला आलेच नाहीत. गोंदिया-भंडारामधील गोंदिया विधानसभा क्षेत्रांतर्गत येणा-या ३४ बुथमधील मतदान बंदच राहिले. तिथे अतिरिक्त मतदान यंत्रे नसल्याने हा प्रकार घडला. पालघरमध्ये ४६.५० टक्के आणि गोंदिया-भंडारामध्ये ४२ टक्के मतदान झाले.

शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी पालघरमधील गोंधळ जाणूनबुजून असल्याचा आरोप केला. बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आ. हितेंद्र ठाकूर म्हणाले की, आमची जिथे विशेष ताकद आहे, त्याच भागांतील मतदान यंत्रांमध्येच कसा बिघाड झाला, याची चौकशी व्हायला हवी.मतदान यंत्रांमुळे उडालेला गोंधळ व उन्हाचा तडाखा, यामुळे पोटनिवडणुकांत मतदान कमीच झाल्याचे दिसून आले. सर्व ठिकाणी मतमोजणी ३१ मे रोजी होईल.

फेरमतदानाची आवश्यकता नाही : आयोगविरोधकांनी मतदान यंत्रांविषयी केलेल्या तक्रारी जरा अतीच आहेत, तितका गोंधळ झालेला नाही, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले. कुठेही आज मतदान रद्द केलेले नाही व फेरमतदानाची गरज नाही, अशी भूमिका आयोगाने घेतल्यामुळे विरोधक अधिकच आक्रमक झाले आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकPalghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018