शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'प्रत्येकाला स्वातंत्र्याचा अधिकार...', केजरीवालांना जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 14:59 IST

Arvind Kejriwal Supreme Court Bail: अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे, पण सध्या ते तुरुंगातच राहतील.

Arvind Kejriwal Bail : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना दिल्ली मद्य धोरणातील कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (12 जुलै) जामीन मंजूर केला. मात्र, केजरीवालांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालेला नाही. याचे कारण म्हणजे, सीबीआयने केजरीवालांना अटक केली होती. या प्रकरणात त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. 

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर केला. खंडपीठाने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या कलम 19 अंतर्गत अटक करण्याच्या आवश्यकतेशी संबंधित प्रश्न मोठ्या खंडपीठाकडे पाठवले. कोर्टाने ईडीच्या अटक अधिकार आणि मद्य धोरणाशी संबंधित तीन प्रश्न तयार केले आणि सांगितले की 10 मेच्या आदेशानुसार केजरीवाल यांना अंतरिम जामिनावर सोडले जाईल.

स्वातंत्र्याचा अधिकार सर्वांना... न्यायमूर्ती म्हणाले की, फक्त चौकशी केल्याने तुम्हाला अटकेची परवानगी मिळत नाही. कलम 19 अंतर्गत याला कोणताही आधार नाही. हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवताना विद्यमान खंडपीठाने केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर केला. केजरीवाल बराच काळ तुरुंगात असल्याचे खंडपीठाने मान्य केले. अंतरिम जामिनाच्या प्रश्नावर मोठ्या खंडपीठाकडून सुधारणा करता येईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच, अरविंद केजरीवाल मागील 90 दिवसांपासून तुरुंगात कैद आहेत. त्यांना अंतरिम जामीन मिळावा, असे आम्हाला वाटते. जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, असेही खंडपीठीने म्हटले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपSupreme Courtसर्वोच्च न्यायालय