शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 15:39 IST

"जेव्हा आपण स्वदेशी वस्तूंची खरेदी करतो, तेव्हा आपला पैसा आपल्याच देशात राहतो. तो परदेशात जात नाही. तोच पैसा पुन्हा देशाच्या विकासात कामी येतो. "

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सणउत्सवांपूर्वीच पुन्हा एकदा देशवासीयांना स्वदेशी वापरण्याचा आग्रह केला. यावेळी स्वदेशी वापराचा देशाला काय फायदा होईल? यासंदर्भातही त्यांनी भाष्य केले. एवढेत नाही तर, प्रत्येक दुकानावर 'गर्व से कहो, यह स्वदेशी है',असे बोर्ड लागायला हवेत, असेही ते म्हणाले. ते आपल्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे आज मध्य प्रदेशातील धार येथे एका कार्यक्रमात बोलत होते. 

पंतप्रधान मोदी म्हणाले, "हा सणउत्सवांचा काळ आहे. आपण स्वदेशीचा मंत्र सातत्याने उच्चारायला हवा. तो तुमच्या जीवनाचा भाग व्हायला हवा. मी करबद्ध विनंती करतो की, तुम्ही जे काही खरेदी कराल, ते भारतात बनलेले असावे. तुम्ही जे काही खरेदी करता त्यासाठी कुण्यातरी भारतीयांचा घाम लागलेला असावा. तुम्ही जे काही खरेदी कराल,त्याला भारतीय मातीचा सुगंध असावा. मी व्यापाऱ्यांना देशासाठी मला पाठिंबा देण्याचे आवाहन करतो. मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे कारण मला २०२७ पर्यंत विकसित भारत निर्माण करायचा आहे आणि त्याकडे जाण्यारा मार्ग आत्मनिर्भर भारतातून जातो."

स्वदेशी खरेदीचे फायदे - दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी स्वदेशी खरेदीचे काही फायदेही सांगितले. ते म्हणाले, "जेव्हा आपण स्वदेशी वस्तूंची खरेदी करतो, तेव्हा आपला पैसा आपल्याच देशात राहतो. तो परदेशात जात नाही. तोच पैसा पुन्हा देशाच्या विकासात कामी येतो. याच पैशांपासून रस्ते तायार होतात. गावांत शाळा तयार होतात, तसेच हाच पैसा गरीब कल्याणच्या योजना राबवताना कामी येतो. मध्यम वर्गाच्या स्वप्नपूर्तीसाठी मोठ्या प्रमाणावर धनाची आवश्यककता असते. हे सर्व आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून साध्य करू शकतो. जेव्हा आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तू आपल्याच देशात तयार होतात, तेव्हा रोजगार निर्मिती होते."

मोदी पुढे म्हणाले, आता २२ सप्टेंबर रोजी, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून, नवे जीएसटी दर लागू होणार आहेत. तेव्हा आपण केवळ स्वदेशी उत्पादनेच खरेदी करायला हवीत. आपण एक मंत्र लक्षात ठेवायला हवा. तो प्रत्येक दुकानावर लिहिलेला असायला हवा, अशी माझी इच्छा आहे. मी राज्य सरकारला एक मोहीम सुरू करण्याचा आग्रह करेन, प्रत्येक दुकानावर एक बोर्ड असावा - "गर्वसे कहो, यह स्वदेशी है."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा