शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 09:01 IST

उच्च न्यायालयाने श्रीनगर न्यायालयाचा आदेश रद्द केला. दोन्ही अल्पवयीन मुलांची कस्टडी आईकडे देण्यात आली असून वडिलांना भेटीचा अधिकार देण्यात आला आहे.

श्रीनगर : वडिलांकडे आईपेक्षा अधिक आर्थिक साधनसंपत्ती असल्यामुळे आईला मुलांच्या संगोपनाचा (कस्टडीचा) हक्क नाकारता येणार नाही, असा महत्त्वाचा निकाल जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाने दिला आहे. सरन्यायाधीश जावेद इकबाल वाणी यांनी आपल्या निर्णयात स्पष्ट केले की, मुलांच्या कल्याणात केवळ आर्थिक सुरक्षितता नव्हे तर भावनिक, नैतिक आणि शारीरिक संगोपनाचाही समावेश होतो. या निर्णयातून उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले की मुलांच्या संगोपनाचे निर्णय हे मुलांच्या सर्वांगीण कल्याणावर आधारित असावेत; केवळ आर्थिक बाबींवर नव्हे.

जगभरातून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव, पंतप्रधान नरेंद्र मोदींना ७५व्या वाढदिवसानिमित्त देशभरात आरोग्य शिबिरे

प्रकरणाची पार्श्वभूमी : हे प्रकरण श्रीनगरमधील एका खंडपीठाच्या आदेशाविरोधात दाखल झालेल्या अपीलातून उद्भवले. स्थानिक न्यायालयाने दोन अल्पवयीन मुलांची कस्टडी वडिलांना दिली होती. हा निर्णय देताना वडिलांकडे अधिक आर्थिक सामर्थ्य असल्याचा मुद्दा तसेच आईकडून कथित करारभंग झाल्याचा आधार घेतला होता.

महत्त्वाचे मुद्दे

केवळ आर्थिक सामर्थ्य पुरेसे ठरू शकते का?

दांपत्यातील कलह, विशेषतः वडिलांना कतारमध्ये पत्नीवर हल्ला केल्याप्रकरणी झालेली शिक्षा.

मुलांच्या भावनिक स्थैर्याचा आणि सातत्यपूर्ण संगोपनाचा प्रश्न.

मुस्लीम वैयक्तिक कायद्यांतील ‘हिजानत’ या संकल्पनेचे अर्थ लावणे.

याचिकेची सध्याची स्थिती  : उच्च न्यायालयाने श्रीनगर न्यायालयाचा आदेश रद्द केला. दोन्ही अल्पवयीन मुलांची कस्टडी आईकडे देण्यात आली असून वडिलांना भेटीचा अधिकार देण्यात आला आहे. २०२२ पासून मुले आईकडे स्थिर वातावरणात राहत असल्याचे, तिच्या पालकांचा तिला आधार असल्याचे व मोठ्या मुलीने “कतारमध्ये नोकरांच्या देखरेखीत राहण्यापेक्षा आईकडे राहणे पसंत असल्याचे” न्यायालयाने नमूद केले.  लहान मुलांच्या संगोपनात आईची अपरिहार्य भूमिका असल्याचे अधोरेखित केले.

टॅग्स :Courtन्यायालय