सीमेवर रात्रीही खडा पहारा, नापाक इरादा रोखण्यासाठी जवान सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2023 08:36 AM2023-01-05T08:36:13+5:302023-01-05T08:37:33+5:30

राजौरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

Even at night on the border, soldiers are ready to prevent nefarious intentions | सीमेवर रात्रीही खडा पहारा, नापाक इरादा रोखण्यासाठी जवान सज्ज

सीमेवर रात्रीही खडा पहारा, नापाक इरादा रोखण्यासाठी जवान सज्ज

googlenewsNext

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीची शक्यता आणि नुकत्याच झालेल्या दहशतवादी घटना लक्षात घेता, सांबा येथील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यासोबतच सांबामध्ये जमावबंदीही (कलम १४४) लागू करण्यात आली आहे.

राजौरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. यासोबतच सांबाच्या जिल्हा आयुक्त अनुराधा गुप्ता यांनी रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत आंतरराष्ट्रीय सीमेवर एक किलोमीटरच्या परिघात जमावबंदी लागू केली आहे.

जम्मूच्या भागातही दहशतवाद्यांची घुसखोरी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दाट धुके आणि बर्फवृष्टीचा फायदा घेऊन दहशतवादी मोठ्या प्रमाणावर  घुसखोरी करतात.

सीआरपीएफच्या आणखी १८ कंपन्या होणार तैनात
जम्मू-काश्मीरमध्ये विशिष्ट समुदायाच्या लोकांची दहशतवादी वेचून हत्या करत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) १८ अतिरिक्त कंपन्या काश्मीरमधील राजौरी, पूँछ येथे तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या १८ कंपन्यांमध्ये १८०० जवान असतील.

हिंदुंच्या हत्या सुरूच
■ राजौरीमध्येदहशतवाद्यांनी चार हिंदुची हत्या केली. दुसऱ्या दिवशी धनगरी गावात आयईडी स्फोट झाला, ज्यामध्ये दोन जण ठार झाले.
■ सध्या या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कर्फ्यू लावण्यात आला.
■ राजौरी येथील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या ८ जणांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत जम्मू आणि काश्मिर सरकारने दिली आहे.
 

Web Title: Even at night on the border, soldiers are ready to prevent nefarious intentions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.