शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पीएनबी घोटाळ्यातील आरोपीलाही वाटतेय मॉब लिंचिंगची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 18:41 IST

गेल्या काही काळात देशातील विविध भागाच झालेल्या मॉब लिंचिंगच्या प्रकारामुळे देशात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या 14 हजार कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी...

मुंबई - गेल्या काही काळात देशातील विविध भागाच झालेल्या मॉब लिंचिंगच्या प्रकारामुळे देशात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या 14 हजार कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी आणि गीतांजली जेम्सचा प्रमोटर मेहूल चौकसी यानेही भारतातील कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी मॉब लिंचिंगचा आधार घेतला आहे. भारतात आल्यास आपल्याचा मॉब लिंचिंगचा सामना करावा लागेल अशी भीती व्यक्त करत त्याने आपल्याविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची मागणी केली आहे.  ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत पीएमएलए कोर्टाने मार्च आणि जुलै महिन्यात मेहुल चौकसीविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. पीएनबी घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच चौकसी हा देश सोडून पसार झाला होता. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला त्याचा भाचा नीरव मोदी हासुद्धा फरार आहे.  विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आपल्या याचिकेत मेहूल चौकसीने माजी कर्मचारी, कर्जदाते आणि तुरुंगातील कर्मचारी आणि कैद्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली. आपल्याला कंपनी चालवणे अशक्य झाले आहे. कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन आणि कर्जदात्यांना त्यांची रक्कम परत मिळालेली नाही. त्यामुळे या सर्वांचा आपल्यावर राग आहे. तसेच त्यामुळे आपल्या जीवाला धोका उत्पन्न झाला आहे, असे चौकसीने आपल्या याचिकेत म्हटले आहे.  हल्लीच्या दिवसात भारतात मॉब लिंचिंगच्या घटना वाढल्या आहेत. सर्वसामान्य जनता रस्त्यावरच प्रकरणांचा सोक्षमोक्ष लावत आहे. अशा परिस्थितील आपल्याबरोबरही असा प्रकार घडू शकतो. असा दावा चौकसीने आपल्या याचिकेत केला आहे.    

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाbankबँकCourtन्यायालय