शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममधून निघाल्या 100 ऐवजी 500 च्या नोटा; अवघ्या काही तासांत एटीएम खळखळाट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 01:45 IST

राजस्थान येथील भरतपूरमध्ये  एका एटीएममधून पैसे काढणाऱ्यांना जणू लॉटरीच लागल्याची घटना घडली. येथील  अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून 100 रुपयांच्या ऐवजी 500 रुपये निघत होते.

जयपूर, दि. 27 - राजस्थान येथील भरतपूरमध्ये  एका एटीएममधून पैसे काढणाऱ्यांना जणू लॉटरीच लागल्याची घटना घडली. येथील  अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून 100 रुपयांच्या ऐवजी 500 रुपये निघत होते. ही बातमी वा-यासारखी गावात पसरली आणि त्या एटीएमबाहेर लोकांच्या रांगाच रांगा लागल्या. दरम्यान, या घटनेची माहिती बॅंकेला समजली असता बॅंक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत एटीएम खळखळाट झाले. अवघ्या तासभरात जवळपास 250 लोकांनी 2 लाख रुपये या एटीएममधून काढून नेले.  भरतपूरमधील डीग गावातील अॅक्सिस बँकेच्या या एटीएममध्ये ही घटना 24 जुलै रोजी घडली. येथील नई सडक मार्गावरील अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून लोक जेव्हा पैसे काढत होते तेव्हा 100 रुपयांऐवजी त्यांना 500 रुपयांच्या नोटा मिळाल्या. त्यामुळे पैसे काढणा-यांना  पाचपट जास्त रक्कम मिळत असल्याने सुरुवातीला आश्चर्य वाटले. त्यानंतर अधिक पैसे मिळत असल्याच्या आनंदात त्यांनी तासांभरात एटीएमच रिकामी केले. या घटनेनंतर आता  बँकेचे कर्मचारी एटीएममधून पैसे काढणाऱ्या लोकांचे पत्ते शोधून त्यांना पैसे परत करण्याची विनंती करत आहेत. तसेच, पैसे काढणारे वेगवेगळ्या बॅंकाचे खातेधारक असल्यामुळे बॅक कर्मचा-यांना अडचणी येत आहेत. तर, काही लोकांनी पैसे परत देण्यास नकार दिला आहे. तर, रामराज नावाच्या व्यक्तीने त्यांना 16 हजार रुपये परत केले आहेत. त्यांना या एटीएममधून 4 हजारच्या ऐवजी 20 हजार रुपये मिळाले होते.दरम्यान, अॅक्सिस बॅंकेच्या डीग येथील शाखेचे मॅनेजर विपुल खंडेलवाल यांनी सांगितले की, एटीएमध्ये चुकीमुळे 100 रुपयांच्या सेल्फमध्ये 500 रुपयांच्या नोटा भरण्यात आल्या, त्यामुळे ही घटना घडली.