शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासाठी भारतातून अमेरिकेत गेले तब्बल २,०२,०१४ विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 06:32 IST

१0 लाख परदेशी विद्यार्थी; भारत दुसऱ्या स्थानावर

वॉशिंग्टन : २०१८-१९ या वर्षात भारतातून २,०२,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेले आहेत. अमेरिकेत शिक्षण घेणाºया आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा विचार केल्यास भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागला आहे. सलग दहाव्या वर्षी चीन हा अमेरिकेत सर्वाधिक विद्यार्थी पाठविणारा देश ठरला आहे.‘आंतरराष्ट्रीय विद्यार्थी देवाण-घेवाण’ या विषयावरील ‘२०१९ ओपन डुअर्स रिपोर्ट’ नावाचा एक अहवाल सोमवारी जारी करण्यात आला. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या सार्वकालिक उच्चांकावर गेल्याचे दिसून आले आहे. याशिवाय सलग चौथ्या वर्षी १० लाखांपेक्षा जास्त विदेशी विद्यार्थी आपापल्या देशांतून अमेरिकेत शिक्षणासाठी आले आहेत.अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला ४४.७ अब्ज डॉलरचे मोठे योगदान दिले आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत हा आकडा ५.५ टक्क्यांनी अधिक आहे. अमेरिकेत शिक्षण घेणाºया आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांत भारत आणि चीन या दोन देशांच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण एकूण विद्यार्थ्यांच्या ५० टक्क्यांपेक्षाही अधिक आहे.२०१८-१९ मध्ये चीनचे ३,६९,५४८ विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. भारतीय विद्यार्थ्यांची संख्या २,०२,०१४ आहे. अमेरिकेत शिक्षण घेणाºया एकूण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या १०,९५,२९९ असून मागील वर्षाच्या तुलनेत ती ०.०५ टक्क्याने जास्त आहे. अमेरिकेत उच्चशिक्षण घेणाºया एकूण विद्यार्थ्यांत विदेशी विद्यार्थ्यांचे प्रमाण ५.५ टक्के आहे. (वृत्तसंस्था)अमेरिकेचे विद्यार्थी विदेशांत मोठ्या संख्येने‘इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन’ (आयआयई) आणि अमेरिकेच्या डिपार्टमेंट आॅफ स्टेट्स ब्युरो आॅफ एज्युकेशन अँड कल्चरल अफेयर्स’ यांनी संयुक्तरीत्या हा अहवाल जारी केला आहे. अमेरिकेच्या शिक्षण व संस्कृती व्यवहार विभागाच्या सहायकमंत्री मेरी रॉयस यांनी सांगितले की, अमेरिकेत शिक्षण घेणाºया आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे, तसेच अमेरिकेचे विद्यार्थीही मोठ्या संख्येने विदेशात शिक्षण घेत आहेत. याचा आम्हाला आनंदच आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाEducationशिक्षण