मराठा महिला मंडळाची स्थापना
By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST
श्रीरामपूर : मराठा महिला मंडळाची श्रीरामपूरमध्ये स्थापना करण्यात आली.
मराठा महिला मंडळाची स्थापना
श्रीरामपूर : मराठा महिला मंडळाची श्रीरामपूरमध्ये स्थापना करण्यात आली.कांताबाई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वंदना मुरकुटे यांची नूतन अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मंडळाच्या संस्थापिका कल्पना बनकर यांनी प्रास्ताविक केले. माजी कोषाध्यक्ष जानकी बनकर यांनी अहवाल वाचन केले. माजी उपाध्यक्षा ताराबाई बनकर व सचिव डॉ. जया कडू यांनी स्वागत केले. नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्षा सीमा जाधव, सचिव स्मिता डावखर, सहसचिव डॉ. सिंधूताई पडघन, खजिनदार जानकी बनकर, सदस्य मिताली सोनवणे, माधुरी खर्डे, नीलम केवल, नलिनी डावखर यांचा समावेश आहे.मराठा समाजातील महिला कतृर्त्वसंपन्न असूनही पुढे येत नाहीत, याविषयी खंत व्यक्त करून मुरकुटे यांनी मराठा समाजातील महिलांनी संघटीत होऊन आपापल्या क्षेत्रात कर्तबगारीने कार्यरत राहिले पाहिजे, असे आवाहन केले. डॉ.स्वाती चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. स्मिता डावखर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)