शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

सर्वसामान्यांना 1 एप्रिलपासून मोठा झटका बसणार, 'या' अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 14:27 IST

Essential Drugs Price Hike: पेनकिलर, अँटी-इन्फेक्टीव्ह, अँटीबायोटिक्स आणि हृदयाच्या औषधांसह जवळपास 900 औषधांच्या किंमती 12 टक्क्यांपेक्षा जास्त वाढू शकतात.

नवी दिल्ली : आधीच महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना 1 एप्रिलला आणखी एक झटका बसणार आहे. आता लोकांना अत्यावश्यक औषधांसाठी आणखी पैसे खर्च करावे लागतील. 1 एप्रिलपासून पेनकिलर आणि अँटीबायोटिक्ससह अनेक अत्यावश्यक औषधांच्या (Essential Medicines Price Hike) किमती वाढणार आहेत. वार्षिक घाऊक किंमत निर्देशांक (WPI) मधील बदलाच्या अनुषंगाने औषध कंपन्यांना वाढ करण्याची परवानगी देण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे.

सरकारने अधिसूचित केलेल्या वार्षिक घाऊक किंमत निर्देशांकात (WPI) वार्षिक बदलामुळे 2022 च्या आधारावर किंमत 12.12 टक्क्यांपर्यंत वाढू शकते, असे औषध किंमत नियामक नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने (NPPA) सोमवारी सांगितले आहे. दरम्यान, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर फार्मा कंपन्या औषधांच्या किमती वाढवण्याची मागणी करत आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, पेनकिलर, अँटी-इन्फेक्टीव्ह, अँटीबायोटिक्स आणि हृदयाच्या औषधांसह जवळपास 900 औषधांच्या किंमती 12 टक्क्यांपेक्षा जास्त वाढू शकतात. नॉन शेड्यूल औषधांच्या (Non-Scheduled Drugs) किमतीत परवानगीपेक्षा जास्त वाढ होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. दरम्यान, शेड्यूल औषधे म्हणजे ती औषधे, ज्यांच्या किमती नियंत्रित असतात. तर उर्वरित औषधे नॉन शेड्यूल्ड औषधांच्या कॅटगरीत येतात आणि त्यांच्या किमती 10 टक्क्यांपर्यंत वाढवल्या जाऊ शकतात. मात्र, नियमानुसार नॉन शेड्यूल औषधांच्या किमती सरकारच्या परवानगीशिवाय वाढवता येत नाहीत.

या आधारे वाढवल्या जातात किंमतीऔषध किंमत नियामक नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीला  (NPPA) मागील कॅलेंडर वर्षाच्या वार्षिक घाऊक किंमत निर्देशांक (WPI) नुसार दरवर्षी 1 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी अनुसूचित फॉर्म्युलेशनच्या कमाल मर्यादा किंमतीत सुधारणा करण्याची परवानगी आहे. औषध किंमत नियंत्रण आदेश 2013 च्या क्लॉज 16 मध्ये या संदर्भात नियम आहे. या आधारावर नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी दरवर्षी औषधांच्या किमतीत सुधारणा करते आणि नवीन किमती 1 एप्रिलपासून लागू होतात.

टॅग्स :medicineऔषधंHealthआरोग्यbusinessव्यवसाय