शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

दहशतवादाची पाळेमुळे उखडून टाका; राजनाथ सिंह SCO देशांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 07:37 IST

एससीओ देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविताना ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांना केले. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे, असेही ते म्हणाले. 

एससीओ देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविताना ते बोलत होते. भारत प्रादेशिक सहकार्याच्या एका अशा मजबूत जाळ्याची कल्पना करतो जे सर्व सदस्य देशांचे न्याय्य हिताची काळजी घेत परस्परांचे सार्वभौमत्व व प्रादेशिक अखंडतेचा आदर करेल. चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू यांच्या उपस्थितीत बोलताना सिंह म्हणाले की, भारताचा संयुक्त राष्ट्रांच्या सनदेतील तरतुदींवर आधारित शांतता व सुरक्षा अबाधित राखण्यावर विश्वास आहे आणि म्हणून एससीओ सदस्यांत विश्वास, सहकार्य वाढविण्यासाठी तो प्रयत्नशील आहे.

दहशतवाद हा भस्मासुरnसिंह म्हणाले की, ‘दहशतवादाचे कोणतेही कृत्य किंवा त्याला कोणत्याही स्वरूपात पाठिंबा देणे हा मानवतेविरुद्धचा गंभीर गुन्हा आहे. शांतता व समृद्धीच्या मार्गातील हा सर्वात मोठा अडथळा  आहे. एखाद्या देशाने दहशतवाद्यांना आश्रय दिला तर तो केवळ इतरांनाच नाही तर स्वतःलाही धोका निर्माण करतो. nतरुणांना कट्टरवादी बनविणे हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चिंतेचे कारण तर आहेच, पण प्रगतीच्या मार्गातही मोठा अडथळा आहे. जर आम्हाला एसीओला एक मजबूत आंतरराष्ट्रीय गट बनवायचे असेल, तर दहशतवादाला प्रभावीपणे सामोरे जाण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असायला हवे.’

पाकिस्तानचा डिजिटल सहभागपाकिस्तान वगळता सर्व एसीओ सदस्य देशांचे संरक्षणमंत्री दिल्लीत आले आणि त्यांनी या परिषदेत भाग घेतला. या चर्चेत पाकिस्तानचे प्रतिनिधी डिजिटल पद्धतीने सहभागी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

गडकरींच्या अध्यक्षतेखाली परिवहन मंत्र्यांची बैठकवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जनाची तीव्रता कमी करण्यासाठी हरित विकास महत्त्वाचा ठरणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी परिवहन मंत्र्यांच्या दहाव्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीला संबोधित करताना केले.आठ सदस्यांच्या या संघटनेत भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिझस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तानचा समावेश आहे. या बैठकीत सर्व देशांनी अधिक कार्यक्षमता आणि टिकाऊपणा साध्य करण्यासाठी वाहतूक क्षेत्रातील कार्बन कमी करणे, डिजिटल परिवर्तन आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या संकल्पनेचे समर्थन केले.

 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहTerror Attackदहशतवादी हल्ला