शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री ममता कुलकर्णी दुबईला पळाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 19:41 IST

दोन हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिन तस्करी प्रकरणी फरार असलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी  दुबईला पसार झाल्याची माहिती आहे. 2000 कोटी रुपयांच्या इफेड्रीन तस्करीप्रकरणी ममता आणि तिचा पती विकी गोस्वामी हे दोघेही आरोपी आहेत. 

ठळक मुद्देदोन हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिन तस्करी प्रकरणी फरार असलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी  दुबईला पसार 2000 कोटी रुपयांच्या इफेड्रीन तस्करीप्रकरणी ममता आणि तिचा पती विकी गोस्वामी हे दोघेही आरोपी आहेत. 

मुंबई, दि. 16 - दोन हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिन तस्करी प्रकरणी फरार असलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी  दुबईला पसार झाल्याची माहिती आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे. 2000 कोटी रुपयांच्या इफेड्रीन तस्करीप्रकरणी ममता आणि तिचा पती विकी गोस्वामी हे दोघेही आरोपी आहेत. फेब्रुवारीमध्ये केनियातून अमेरिकेच्या ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशनने (DEA) विकी गोस्वामी आणि त्याचे तीन साथीदार इब्राहिम, बख्ताश आक्शा आणि पाकिस्तानी अमली पदार्थ वितरक गुलाम हुसैन यांना अटक केली होती. चौघांच्या अटकेवेळी ममताही घटनास्थळी होती. मात्र ती पोलिसांच्या हाती सापडली नाही. विकी गोस्वामीला अटक झाल्यानंतर लगेचचच ममताने केनिया सोडून दुबईला पळ काढल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. तर आता ती दुबईहून देखील पसार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिच्याविरोधात ठाणे पोलिसांकडून रेड कॉर्नर नोटीसही बजावली जाऊ शकते.वर्षभरापूर्वी ठाणे पोलिसांनी सोलापूर येथील एव्हॉन लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या फॅक्टरीवर छापा टाकून 2 हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिनची देश-विदेशात तस्करी करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड केला होता. ‘इफेड्रीन’च्या या तस्करीमध्ये ममता आणि तिचा पती विकी गोस्वामीचं नाव पुढे आलं होतं. या प्रकरणात ममता कुळकर्णी आणि विकी गोस्वामीचा सहभाग पोलिसांनी न्यायालयासमोर स्पष्ट केल्यानंतर त्यांच्याविरूद्ध तीनवेळा अटक वॉरंट बजावण्यात आले. अखेर ठाणे न्यायालयाने 6 जून रोजी ममता कुलकर्णीला फरार घोषीत केलं. केनिया आणि टांझानियात इफेड्रीनवर प्रक्रिया करून मेथ एन्फाटामाइन हा ‘आइस’ नावाचा मादक पदार्थ बनवून त्याची इतर देशांमध्ये तस्करी केल्याचा विकी आणि ममतावर आरोप आहे. 

आतापर्यंत या प्रकरणी सोलापूरच्या ‘एव्हॉन लाइफ सायन्सेस लि.’ या कंपनीचा माजी संचालक मनोजजैनसह गुजरातच्या माजी आमदाराचा पुत्र किशोर राठोड, पुनीत श्रींगी आणि जयमुखी आदी १५ जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये दोन नायजेरियन नागरिकांचाही समावेश आहे. जैन याच्यासह १५ जणांविरुद्ध ठाणे जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. जैन आणि कंपनीचा सल्लागार पुनीत श्रींगी यांनी कशा प्रकारे कोट्यवधी रुपयांच्या सुमारे १०० किलो इफेड्रीनची तस्करी केली, याबाबतचे अनेक पुरावे या आरोपपत्रात जोडले आहेत. जैन याने पुनीतसह या सर्वांना हाताशी धरून कंपनीतील इफेड्रीन बाहेर काढले. आंतरराष्ट्रीय ड्रगमाफिया विकीच्या मदतीने केनिया तसेच दक्षिण अफ्रिकेत या मालाची तस्करी केली. हवालामार्फत त्यासाठी त्यांनी करोडो रुपये स्वीकारले. याशिवाय, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि सोलापूर आदी परिसरात इफेड्रीनची मोठी तस्करी केली. १४ एपिल २०१६ रोजी सोलापूरच्या एव्हॉन कंपनीवर पोलिसांनी छापे टाकून जयमुखी, विकी तसेच ममता कुलकर्णी यांच्याविरुद्ध पुरावे गोळा केले आहेत. याच पुराव्यांच्या आधारे आता ठाणे न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. इफेड्रीनच्या तस्करीत विकीसह ममताचाही सहभाग असून, ती अनेक बैठकांना त्याच्यासोबत हजर असल्याची माहिती जयमुखीच्या जबाबातून पोलिसांना मिळाली होती. 

आणखी वाचा- (ममता कुलकर्णीच्या भूमिकेत सनी लिओन)