शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

जुलै अखेर ईपीएफओ सदस्यांना मिळू शकते व्याज; उच्चस्तरीय सूत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 06:52 IST

येत्या जुलैअखेरपर्यंत व्याजाची रक्कम सदस्यांच्या खात्यावर जमा होऊ शकते, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. 

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सहा कोटी सदस्यांना २०२०-२१ या वित्त वर्षासाठी ८.५ टक्के दराने व्याज दिले जाण्याची शक्यता असून, येत्या जुलैअखेरपर्यंत व्याजाची रक्कम सदस्यांच्या खात्यावर जमा होऊ शकते, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. सूत्रांनी सांगितले की, यासाठी आवश्यक असणारी परवानगी ईपीएफओला कामगार मंत्रालयाकडून मिळाली आहे. यासंबंधीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाऊ शकते. गेल्यावर्षी २०१९-२० या वित्त वर्षाचे व्याज मिळण्यासाठी अनेक ईपीएफओ खातेधारकांना तब्बल दहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली होती. ईपीएफओने वित्त वर्ष २०२०-२१ साठी व्याजदरात बदल न करण्याचा निर्णय घेतला असून, व्याजदर ८.५ टक्के असा कायम ठेवला आहे. याशिवाय कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे खातेधारकांना बिना परतफेडीची कोविड-उचल काढण्याची सुविधाही देण्यात आली आहे.यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ०११-२२९०१४०६ या क्रमांकावर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफ शिलकीचा तपशील सदस्यास  मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल स्वयंचलितपणे डिस्कनेक्ट होईल. 

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधी