शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

संपूर्ण देश ‘मोदी का परिवार’, भाजपची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 10:50 IST

राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी कुटुंब नसल्याबद्दल पंतप्रधानांवर टीका केल्यानंतर भाजपने आपल्या सर्वोच्च नेत्याशी एकजूट दाखवत सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये ‘मोदी का परिवार’ हे शब्द जोडले.  

नवी दिल्ली/आदिलाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश हे त्यांचे कुटुंब आहे, असे प्रतिपादन केल्यानंतर गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सोमवारी त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये ‘मोदी का परिवार’ हे शब्द जोडले. 

राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी कुटुंब नसल्याबद्दल पंतप्रधानांवर टीका केल्यानंतर भाजपने आपल्या सर्वोच्च नेत्याशी एकजूट दाखवत सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये ‘मोदी का परिवार’ हे शब्द जोडले.  

तेलंगणातील आदिलाबाद येथील सभेत मोदींनी सोमवारी देशातील “वंशवादी पक्षांवर” हल्ला चढवला आणि म्हटले की त्यांचे चेहरे भिन्न असू शकतात, परंतु ‘झूट आणि लूट” हे त्यांची समान प्रवृत्ती आहे. देशातील १४० कोटी जनता त्यांचे कुटुंब आहे. राजद नेते लालू प्रसाद यादव यांनी रविवारी पाटणा येथे विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या मेळाव्याला संबोधित करताना, घराणेशाहीच्या राजकारणाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल मोदींवर टीका केली.

तेलंगणात ५६,००० कोटींच्या विकास प्रकल्पांचा प्रारंभ- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तेलंगणातील ५६,००० कोटींहून अधिक किमतीच्या ऊर्जा, रेल्वे आणि रस्ते क्षेत्राशी संबंधित अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली, तर काही राष्ट्राला समर्पित केले. पंतप्रधानांनी इतर प्रकल्पांसह पेड्डापल्ली येथे एनटीपीसीचा ८०० मेगावॉट (प्रकल्प-२) तेलंगणा औष्णिक विद्युत प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला. 

- अल्ट्रा-सुपरक्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित, हा प्रकल्प तेलंगणाला ८५ टक्के वीजपुरवठा करेल आणि देशातील एनटीपीसीच्या सर्व ऊर्जा केंद्रांत तेथील वीजनिर्मिती क्षमता (अंदाजे ४२ टक्के) सर्वाधिक असेल.

- भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, विरोधी पक्ष गेल्या १६-१७ वर्षांपासून मोदींवर वैयक्तिक हल्ले आणि त्यांच्याविरोधात अशा ‘शूद्र’ टिप्पणी करत आहेत. लालू प्रसाद यादव यांची टिप्पणी दुःखद आणि वेदनादायक आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाElectionनिवडणूकlok sabhaलोकसभा